shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गडचिरोली : अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी अखेर एका व्यवसायिकाला अटक...तीन दिवसांची पोलीस कोठडी..!!

गडचिरोली : कोरची तालुक्यातील अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लावणाऱ्या इसमास पोलिसांनी अटक केली आहे. किरण प्रकाशचंद्र अग्रवाल (३८) रा. कोरची असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. किरण अग्रवाल हा कोरची येथील व्यावसायिक आहे.न्यायालयाने आरोपीस तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला आहे.
                            

अल्पवयीन आदिवासी मुलींच्या असाहायतेचा फायदा घेत तिच्याशी आरोपींने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती राहिली.वैद्यकीय चाचणीनंतर ही बाब लक्षात आली. शासनाच्या वतीने उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांनी फिर्याद नोंदविली.मात्र आरोपींवर गुन्हा दाखल झाला नव्हता. आरोपीकडून पीडित अल्पवयीन मुलीवर आणि तिच्या आई-वडिलांवर प्रचंड दबाव आणला होता. त्यामुळे ते कोणाचे नाव घेण्यास तयार नव्हते. मात्र अनेक प्रसार माध्यमांनी हे लावुन धरल्यामुळे पोलिसांनी २३ ऑगस्ट ला अज्ञात आरोपी विरोधात भांदवि ३७६(२) (जे) सह पोक्सो कायद्याच्या कलम ४ अन्वये कोरची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु आरोपीस अटक झाली नव्हती. आरोपी एका राजकीय पक्षांच्या नेत्यांचा जवळचा नातेवाईक असल्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर ही प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. तर अनेक संघटना आरोपीस अटक व्हावी यासाठी आग्रही होत्या.
                            
अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भंवर यांनी या प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेऊन पिडीत मुलगी आणि तिच्या वडिलांचे बयान नोंदविले. त्यानंतर श्री. भंवर यांनी वेगाने तपास करुन बुधवारच्या रात्रीच आरोपी किरण प्रकाशचंद्र अग्रवाल यास अटक केली. त्यासोबत आरोपींवर अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचेही कलम जोडण्यात आली आहे. अटक केल्यानंतर आरोपीस न्यायालयापुढे उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
close