इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार):
वडापुरी (ता. इंदापूर) देि.२८ऑगस्ट 2020 श्री नाथ महाराजांच्या पावन भूमीत वडापुरी येथील यशस्वी व सर्वांच्या कृपाशीर्वादाने चालणारे हॉटेल अमरनाथ चे मालक श्री मुकुंद टकले राहणार पंधारवाडी यांच्या प्रेरणादायी व्यवसाय यामागील गुड काय हे पहात असताना त्यांच्या जीवनातील व हॉटेल व्यवसायातील आणि दोस्त दुनियादारीतील मदत यातून घडलेली संघर्ष कहाणी आपणास आवर्जून सांगावे असे वाटते की मुकुंद टकले हे वयाच्या सहा वर्ष असताना त्यांची आई दीर्घ आजाराने त्यांना व त्यांच्या पेक्षा लहान 2 बहिणींना सोडून स्वर्गवासी झाली त्यावेळी त्यांचे वडील जेलमध्ये असल्याने त्या तीन भावंडांना ज्या परिस्थितीला सामना देवा लागला त्या परिस्थितीची रुदय भरून येणारी कहाणी हे कोणालाही न सांगण्यासारखी आहे अशा परिस्थितीत त्यांच्या गिरवी येथील मामांनी व आजी यांनी त्यांचा सांभाळ केला त्याची लहान बहीण अतिशय लहान दूध पेत होती अशा अवस्थेत मुकुंद टकले यांच्यावर या वयातच जबाबदार पडली यावेळी पडेल ते काम मिळेल ते खाणे अशा परिस्थितीत राहिले त्यानंतर त्यांच्या वडिलांची सुटका झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी दुसरा विवाह करून आपला स्वतःचा प्रपंच उभा केला आणि हे तीन भावंडे व आई वडील नव्याने आपले जीवन चरित्र घडवत होते याच काळात मुकुंद टकले इयत्ता पाचवी पर्यंत कसेबसे शिकले व त्यात ते नापास झाले मिळालेला निकाल फाडून इंदापूर येथे चालत जाऊन हॉटेलमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु दिवसभर कोणीही त्यांना होकार दिला नाही यांच्या अात्या माळवाडी येथे राहत असल्याने त्यांच्या आश्रयाने व त्यांच्या मुलाच्या साह्याने त्यांनी इंदापूर येथील बच्चू भाऊ कांबळे यांच्या अशोक हॉटेल मध्ये दीड रुपये रोजाने पडेल ते काम केले या काळातच अतिशय लहान वयात इंदापूर येथे आपला जिवाभावाचा मित्र परिवार तयार केला बच्चू भाऊकांबळे यांच्या हॉटेल मध्ये दीड वर्ष काम करून वडीलांच्या ओळखीचे मित्र पोंडे यांच्या ओळखीने सावंतवाडी पुणे येथे दीड वर्ष स्वीट होम मध्ये पडेल ते काम करून राहिले त्यानंतर घरी आल्यावर त्यांचे वडील डिघामामा धोत्रे ( तेली) यांच्या हॉटेल मध्ये काम करीत होते त्या ठिकाणी मुकुंद टकले यांना कामावरती ठेवले व तेथे मोठ्या बहिणीचे लग्न ठरल्यानंतर पाच हजार उचल घेऊन व ओळखीच्या नात्याने एका इसमाकडून पाच हजार घेऊन त्यांच्या बहिणीचे लग्न लावले काही दिवसांनी दिगंबर धोत्रे यांची हॉटेल मध्ये सर्व आचारी ची कामे शिकून घेतल्याने जास्त रोजाने कामापोटी पुन्हा बच्चू भाऊ कांबळे यांच्या हॉटेलमध्ये काम केले या काळात ज्या इसमाकडून 5000 घेतले होते त्यांना परत करण्यासाठी पैसे नसल्याने या हॉटेल व्यवसायाच्या कलेवर पैसे देण्यासाठी पैसे नसल्याने सदर इसमाने वडिलांना ओलीस ठेवले अशा परिस्थितीत सदर इसमाचे पैसे देण्यासाठी मुकुंद टकले यांना त्यांच्या मित्रपरिवाराने विशेष सहकार्य करून त्यांच्या वडिलांना सोडवले व उचल रक्कम घेऊन टेंभुर्णी येथील प्रकाश पाटील सत्कार हॉटेल यांच्या कडे कामावर राहिले याठिकाणी तीन वर्ष मुकुंद टकले यांनी अतिशय प्रामाणिक काम केले व त्याचे फळ म्हणून त्यांचे इंदापूर चे व्यंकटेश नगर मित्र परिवार शिवाजी मित्र मंडळ मनोज व्यायामशाळा या मित्रांनी त्यांना तेथून सोडवण्यासाठी स्वतःच्या खिशातून सर्वांनी पैसे गोळा करून सदर पाटील यांच्याकडे मुकुंद टकले यांचे राहिलेले उचल पैसे देण्यासाठी गेले असता सदर मालकाने मित्रांच्या प्रेमाचा आणि मुकुंद यांचा प्रामाणिकपणा पाहून राहिलेली उचल रक्कम न घेता मुकुंद यांना व्यवसाय करण्यासाठी रक्कम देण्याची तयारी दर्शवली या घटनेतून मुकुंद आणि त्यांच्या मित्राने मुकुंद याला इंदापूर येथे पालखीच्या येण्याच्या मुहूर्तावर साडेतीन हजार रुपये गोळा केलेले त्यावर त्यांना व्यवसाय करण्यास मदत केली सदर मदतीचा हातभार म्हणून मुकुंद व त्यांच्या वडिलांनी पालखीबरोबर हॉटेल गाडा घेऊन व्यवसाय केला व त्यातून त्यांना भरीव असा नफा झाला त्यानंतर अंबाजी लिंबाजी देवस्थान येथे दोन महिने हॉटेल व्यवसाय करून अतिशय चांगला नफा मिळवला त्यानंतर इंदापूर येथे रूपाली बियरबार च्या शेजारी श्याम सुपेकर यांची टपरी बंद होती ती त्या ठिकाणी अविनाश दादा वाघ यांच्या सहमतीने सदर ठिकाणी हॉटेलचा गाडा चालू केला त्यांनी अतिशय चांगली मदत करून सहकार्य केले.त्या ठिकाणी अतिशय छान असा हॉटेल व्यवसायाचा धंदा करून मुकुंद टकले यांनी आपला प्रामाणिक धंदा इंदापूर परिसरात दाखवून दिला याच काळात त्यांचे लग्न झाले हॉटेल व्यवसाय चांगला चालू होता परंतु दृष्ट लागण्यासारखे घटना घडली व ते कर्जबाजारी झाले.
याच काळात इंदापूर येथे हॉटेल व्यवसाय करणे कर्जबाजारीपणामुळे अवघड झाल्याने या चिंतेत असताना परमेश्वरा सारखे दिलदार मनाचा मित्र लोणी देवकर येथील विजय डोंगरे यांनी त्यांच्या घरातील 10 हजार रुपये व दुकानातील हॉटेलचे सर्व साहित्य देऊन पेट्रोल पंपाच्या शेजारी पुणे सोलापूर हायवे रस्त्याच्या कडेला हॉटेल उभारून व्यवसाय चालू केला यामध्ये पहिल्याच दिवशी तेवीस हजाराचा धंदा झाल्याने मुकुंद टकले यांचे भविष्य उजळले यातून त्यांनी आपले घर जागा कर्ज सर्व पेड करून पैसे शिल्लक राहिले याच काळात काही दिवसांनी दृष्ट लागण्यासारखी आणखी एक घटना घडली आणि त्यांना या ठिकाणचे हॉटेल बंद करावे लागले यातूनही ते धीर न खचून देता वडापुरी येथे चंगू जाधव यांच्या मार्गदर्शनाने व जाधव यांच्या परिवाराच्या कृपा छायेणे वडापुरी चौकात सुरुवातीला हॉटेल गाडा उभा करून हळूहळू प्रगती करत झालेल्या व्यवसायातून त्यांनी वडापुरी येथे जाधव परिवार व वडापूर येथील ग्रामस्थांच्या आशीर्वादाने हॉटेल अमरनाथ अतिशय प्रामाणिक आणि स्वतः ग्राहकांची सेवा करीत आहेत त्यांचा हा कष्टाळू चिकाटी व प्रामाणिक पणाचा स्वभावाने आज त्यांच्या उत्कर्षा मध्ये भर पडली आहे त्यांच्या या कार्याची व जिद्दीची आणि जीवनात घडलेल्या घटनेतून असे दिसते की त्यांचा हा जीवन संघर्ष आहे त्यांच्या या यशस्वी जीवनात आजी मामा आत्या व त्यांचा परिवार यांनी आई वडील याची माया दिली त्याबरोबर त्यांच्या पत्नी यांचा वाटा आहेच तसेच जे परमेश्वरा सारखे मदतीला धावून आलेले इंदापूरचे मित्र मंडळ मित्रपरिवार तसेच ज्यांनी मार्गदर्शन व मदतिचा हात दिला असे लोणी चे विजय डोंगरे व आपल्या गावचे श्री नवनाथ ज्ञानदेव जाधव परिवार व चंगू जाधव आणि सोमनाथ पवार यांनी त्यांच्या जीवनात भरीव अशी मदत केली या व्यक्ती मुकुंद टकले यांना परमेश्वर मय असल्याचे वाटताहेत खरंच टकले व त्यांच्या मित्र परिवार यांचे हे नाते जगासमोर आदर्शवत ठरणारी आहे असेच सहकार्य प्रत्येकांनी आपल्या मित्राना दिल्यास मुकुंद टकले यांच्या सारखे अडचणीत सापडलेले अनेक मित्र टकले यांच्यासारखे उद्योग व्यवसाय मध्ये उभा राहतील हा आदर्श संदेश देण्यासारखा आहे. यांच्या या कार्याचे सुशिक्षित बेरोजगार यांना प्रेरणादायी कार्य करणारे आहे. मुकुंद टकले यांच्या जीवन संघर्ष प्रवासातून आपणास असे दिसून येते की आलेल्या परिस्थितीवर खचून न जाता त्यामध्ये वेळोवेळी बदल करून आपले यशस्वी जीवन कसे करता येईल याचे अचूक उदाहरण म्हणजे त्यांचे हे संघर्षमय जीवन चरित्र सर्वांना प्रेरणादायक ठरते

