लोहा (प्रतिनिधी) :
लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्ते सौ . आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वडेपुरी जि. प. सर्कल मधील हरबळ, किवळा, ढाकनि, दापशेड, वडेपुरी, येथील सर्व गावकऱ्यांना सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या संकटात माझा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करा अशा सूचना सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या, सौ. आशाताई शिंदे यांच्या सूचना त्यांचे कार्यकर्ते तंतोतंत पालन करत असून लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघातील गावे वाडी ,तांड्यावर जाऊन नागरिकांना सॅनिटायझर व मास्क चे वाटप कार्यकर्ते उस्फूर्तपणे करीत असल्याचे दिसत आहे. काल बुधवारी वडेपुरी जि. प. सर्कल मधील गावकऱ्यांना आमदार शामसुंदर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी सॅनिटायझर व मास्क चे वाटप केले .
या कार्यक्रमाला आनंद देशमुख लोंढे सांगवीकर ,श्रीकांत दळवी, भाऊराव काळेवार ,रामगिरी महाराज ,परसराम शिंदे ,गोविंद बसवंती ,माधव शिंदे ,बापूराव टूरके, अच्युत सर्जे, समज पठाण, विठ्ठल कदम ,सचिन सोनवणे, आनंद जमला पुरे, सचिन चित्त के, आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

