प्रतिनिधी । मोहन शेगर
सोनई :-नेवासा तालुक्यात एकूण १६ रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती तालुका आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. शहरासह तालुक्याची पाठ कोरोना सोडायला तयार नसल्याचे दिसत आहे .
आज देखील कोरोनाने आपल्या वाढत्या रुग्णांच्या आकड्याची दहशत कायम ठेवली आहे. एका रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला नगर सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.तसे आज दिवसाअखेर ०६ कोरोना बाधित रुगणांनी, कोरोना वर मात केली आहे.
यामध्ये सोनई 1, शनिशिंगणापूर1, घोडेगाव 2, नेवासा 10, उस्थलदुमला 1, नारायणवाडी 1, असे रुग्ण असून बेलेकरवाडी येथील संपर्कातील 18अहवाल निगेटिव्ह आले.
तसेच धनगरवाडी येथील 9जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.तसेच आज सायंकाळ पासून नेवासा नगरपंचायत व मुकिंदपूर ग्रामपंचायत हद्दीत ‘ जनता कर्फ्यु’ जाहीर करण्यात आला आहे.

