shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोपरगाव तहसिल चे लिपिक देशमुख यांचा महसूल दिनी गौरव....!!

शिर्डी प्रतिनिधी :
कोपरगाव येथील तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले लिपिक रविंद्र देशमुख यांचा आदर्श कर्मचारी म्हणून  गौरव करण्यात आला.रविंद्र देशमुख हे कोपरगाव येथील तहसिल कार्यालयात लिपिक या पदावर कार्यरत असून ते एक उत्तम प्रशासक कार्यक्षम अधिकारी असून ते आपल्यावर अलेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने हाताळतात त्यांचा याकार्याबद्दल श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी कार्यालय शिर्डी येथे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,पोलिस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या शुभहस्ते गौरव करत सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी तहसिलदार योगेश चंद्रे,कुंदन हिरे, निवासी नायब तहसिलदार योगेश्वर कोतवाल, मनिषा कुलकर्णी यांचे सह राहाता व कोपरगांव तहसिलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या वेळी रविंद्र देशमुख यांनी सांगितले की मी माझ्या परीने प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यासाठी व महसूल विभागाची प्रतिमा उंचविण्यासाठी भविष्यात देखील मी सर्वोतपरी प्रयत्न करेन.असे सांगितले.श्री. देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
close