shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी मध्ये दररोज कोरोना रॅपिड टेस्ट! डॉ.सौ. स्वाती म्हस्के व त्यांची टीम घेत आहे मोठे परिश्रम..!!

सावळीविहीर । प्रतिनीधी( राजकुमार गडकरी)➤
शिर्डीमध्ये दररोज कोरोना रॅपिड टेस्ट घेण्यात येत आहेत.कोरोना रॅपिड टेस्ट या शिर्डीतील संस्थांनच्या 500 रूम भक्त निवास समोरील एका खाजगी हॉटेलात होत आहेत ,रमेश प्रेमानी यांनी आपले हॉटेल कोरोना रॅपिड टेस्ट साठी समाज सेवेची भावना ठेवून मोफत दिले आहे.या हॉटेलमध्ये कोरोणा बाधित रुग्णं, त्यांचे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य व संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना रॅपिड टेस्ट केली जाते.



येथे कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या  संशयित व्यक्तींचा स्राव काढून कोरोना रॅपिड टेस्ट करून पंधरा ते वीस मिनिटात ही व्यक्ती कोरोना बाधित आहे की नाही! हे समजते. राहता ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती म्हस्के या गेल्या काही दिवसापासून दररोज येथे कोरोना रॅपिड टेस्ट घेण्यासाठी  मोठे परिश्रम घेत आहेत. राहता येथील ग्रामीण रुग्णालयाच्या  वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगारदिवे,सचिन सातपुते,व्यवहारे मॅडम लॅब टेक्नीशियन संदीप गमे, तसेच नगरपंचायतीचे विलास लासुरे ज्ञानदेव जावळे, संग्राम राजपूत नवनाथ गोंदकर, संतोष शेजवळ व शिर्डीचे नोडल अधिकारी मुरलीधर देसले,

अनिल शेळके आदी कोरोना योद्धे मोठे परिश्रम घेत आहेत. येथे शिर्डीतील कोरोनाची लक्षणे आढळलेल्या संशयित व्यक्तींचा स्राव घेऊन  रॅपिड टेस्ट करण्यात येत असते. मोठी रिस्क घेऊन ,जीव धोक्यात घालून हे सर्व कोरोना योद्धे  येथे मोठी सेवा करत आहेत .ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती म्हस्के ह्या कोरोना काळात अहोरात्र काम करत आहेत.येथेही त्या प्रत्येक कोरोना रॅपिड टेस्ट साठी  सारख्या धडपडत असतात ,स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या कोरोणा बाधित रुग्णांशी सौजन्याने बोलणे. त्यांना धीर देणे .त्यांना आपण बरे होण्यासाठी विश्वास निर्माण करणे. असे त्यांचे वागणे ही सर्व कोरोना रुग्णांना दिलासा देणारे ठरत आहे.त्या स्वतः फक्त  मास्क वापरतात. तसेच इतरांनाही मास्क  नेहमी वापरावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

कोरोना होऊ नये ,यासाठी मोठी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे तसेच जर कोरोनाची लक्षणे कोणाला आढळल्यास त्यांनी त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. घाबरून जाऊ नये. असेही आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती म्हस्के यांनी केले आहे. त्यांचे काम मोठे धाडसाचे असूनही त्या इतरांना धीर देत असतात. त्यामुळे कोरोना बाधित व्यक्ती हा मानसिक दृष्ट्या येथेच सशक्त होत असल्याचे दिसून येत आहे. अशा आपल्या कामाशी निष्ठा असलेल्या महिला डॉक्टर स्वाती म्हस्के यांचे शिर्डीत नव्हे तर शिर्डी परिसरात, राहता तालुक्यातून मोठे कौतुक होत आहे.  शिर्डीत येथे  दिवसाला सुमारे कमीत कमी 70 ते 80 व  जादा 150 ते 200 पर्यंत  दररोज कोरोना रॅपिड टेस्ट होत आहेत. त्यामध्ये दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे.
close