shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी व परिसरात श्रींची साध्या पद्धतीने पण उत्साहात प्रतिष्ठापना! शिर्डी सह सुमारे अकरा गावात एक गाव एक गणपती..!!

सावळीविहीर (प्रतिनिधी)
शिर्डी शहरात तसेच  शिर्डी परिसरातील सुमारे 11 गावांमध्ये एक गाव एक गणपती ची प्रतिष्ठापना नुकतीच उत्साहात करण्यात आली कोरोनामुळे सोशल डिस्टन्स व सर्व अटी नियम घेऊन श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. शिर्डीतही एक गाव एक गणपतीचा सर्वानुमते निर्णय घेऊन आज गणेश चतुर्थी च्या दिनी शिर्डीतील श्री मारुती मंदिरात सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवत व पूजा करून करण्यात आली.



शिर्डीतील श्री प्रसिद्ध अशा दक्षिणमुखी हनुमान मंदिरात  एक गाव एक गणपतीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची पूजा शिर्डीच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते पाटील, यांच्या हस्ते तसेच श्री साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी श्री रवींद्र ठाकरे, शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री सोमनाथ वाकचौरे, राहता तालुका शिवसेना प्रमुख संजय अप्पा शिंदे, शिर्डी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री मंगेश नाना त्रिभुवन, शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गधांले, आदी प्रमुख व्यक्तींच्या हस्ते श्रीगणेशाची पूजा विधिवत करण्यात आली. श्री साईबाबा संस्थानचे पुजारी व  कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

शिर्डी येथे श्री कोरोनामुळे एक गाव एक गणपती बसवण्याचा सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचा एकमुखी निर्णय झाल्याने येथे श्री मारुती मंदिरात आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्ती सकाळी श्रीगणेशाची सर्व मंडळ मिळून विधिवत प्रतिष्ठापना  करण्यात आली.यावर्षी कोरोनामुळे सर्व गणेश मंडळांनी हा निर्णय घेतला व आपापले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. हा निर्णय घेतल्यामुळे प्रशासनानेही सर्व सार्वजनिक गणेश मंडळाचे आभार मानले आहेत.शिर्डी व परिसरातील  गावांमध्येही घरोघर श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. बालगोपाळांमध्ये यावर्षीच्या गणेशोत्सवाचा उत्साह जरी मोठा असला व गणेशभक्तात उत्साह मोठा असला तरी मात्र कोरोनामुळे हा गणेश उत्सव शांत शांतच दिसून येत आहे.घरोघर श्रींच्या प्रतिष्ठापना झाले असून मनोभावे श्री ना कोरोनाच्या संकटातुन लवकर सर्वांना मुक्त कर !असी प्रार्थना श्रीगणेशा पुढे करण्यात येत आहे.

दरम्यान गणेशोत्सवासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच शिर्डी नगरपंचायतीनेही व्यवस्थित नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे शिर्डी परिसरातील काही गावांमध्ये ही एक गाव एक गणपती असून अशा गावांमध्ये ही श्रींची विधिवत पूजाअर्चा करून प्रतिष्ठापना करण्यात आली .तेथे ग्रामपंचायती नियोजन करत आहे. एकूणच शिर्डी व परिसरात श्री गणेशाचे उत्सवात आगमन झाले असून  अनेक गावात एक गाव एक गणपती तसेच घरोघरी ही श्रींच्या मूर्तीची आनंदात, उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
close