shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दुचाकीस्वराचे रस्त्यावर पडलेले पैशांचे पाकीट पोलिसांनी पुन्हा परत करून प्रामाणिकता व पोलिसातील माणुसकीचे दर्शन घडविले...!!

राजगुरुनगर । प्रतिनिधी  (विद्याधर साळवे) ➤ 
नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी स्वराचे रस्त्यावर पडलेले पैशांचे पाकीट पोलिसांनी पुन्हा मूळ मालकास परत करून पोलीसातील माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
           


याबाबत घडलेली घटना अशी की शनिवार ( दि.२२) रोजी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरील राजगुरुनगर शहराच्या पुढे असलेल्या खेड घाटाच्या वरील बाजूस हॉटेल बिकानेर समोर महामार्ग पोलीस मदत केंद्र आळेफाटा येथील पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे , ASI डी.डी.घनवट, गुलाब हिंगे,पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर कोंढरे, ड्रायव्हर संतोष पठारे यांचे पोलीस गस्तपथक महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे वेग स्पीडगणने तपासत असताना दुपारी साडेबारा वाजता महामार्गावरून दादासाहेब बबन जाधव हे आपली दुचाकी ( एम. एच.४२ - ४१३८ ) वरून  लहान मुलासह नारायणगाव वरून पुणे कडे जात असताना त्यांचे पैशांचे पाकीट रस्त्यावर पडले. त्यांचे लक्ष नसल्याने ते निघून गेले. परंतु ते पडलेले पैशांचे पाकीट पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरले पोलिसांनी  ते पैशांचे पाकीट उघडून पाहिल्यावर त्यामध्ये आधार कार्ड,  पॅन कार्ड व रोख रक्कम 11 हजार रुपये मिळून आले. गस्तीवरील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर कोंढरे यांनी तातडीने दुचाकीवरील दादासाहेब जाधव यांचा पाठलाग करून पुन्हा त्यास बोलावून आणले व पाकिटाची ओळख पटवून आधार कार्ड , पॅन कार्ड व रोख 11 हजार रुपयांसह पाकीट पुन्हा परत केले.

           
यावेळी दुचाकीस्वार दादासाहेब जाधव यांनी सांगितले की नारायणगाव येथील सासुरवाडी वरून पत्नी व मुलासह स्वतःच्या गावी इंदापूर तालुक्यातील बावडा येथे चाललो होतो दुचाकी मध्ये पेट्रोल भरताना पेट्रोल पंपावर पैशांचे पाकीट काढले असता ते पैशांचे पाकीट लहान मुलाच्या हातात गाडीवर तसेच राहिले व रस्त्याने जाताना लहान मुलाच्या हातून ते पैशांचे पाकीट रस्त्यावर पडले परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे व प्रामाणिकपणामुळे पैशांचे पाकीट पुन्हा परत मिळाले असून त्या दोन्ही पती-पत्नीने महाराष्ट्र पोलिसांचे डोळ्यात पाणी आणून आभार मानले.या घटनेमुळे पोलीसातील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन दिसले अशी भावना यावेळी उपस्थितांनी बोलून दाखविली.
close