shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रुग्णांना फळे वाटप करून श्री हर्षवर्धन पाटील साहेब यांचा केला वाढदिवस साजरा..!!


इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤ 
दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी इंदापूर पंचायत समिती सभापती व सदस्य यांनी हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप केले तालुक्याचे आधारस्तंभ माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील सो.यांच्या वाढदिवसा निमित्त उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे व डाँ.बाबासाहेब आंबेडकर भवन वस्तीग्रह येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी ते आजारातून लवकर बरे व्हावे, यासाठी त्यांना डाळिंब ,केळी फळांचे वाटप करण्यात आले.



यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस बांधव यांचादेखील सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई रेडके, पंचायत समिती सदस्या सौ.स्वातीताई शेंडे, सौ.रोहिणीताई घोगरे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य . श्री.महेंद्रदादा रेडके, श्री. बापूराव शेंडे, श्री.गोरख शिंदे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री दादासाहेब घोगरे आदी उपस्थित होते.
close