shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत आमदार रोहित पवारांचे मोठे विधान,म्हणाले.....!!

शिर्डी प्रतिनिधी:
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असून आतापर्यंत तब्बल आठ हजार कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.त्यामुळे गेल्या काही दिवसांपुर्वी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी लॉकडाऊनची मागणी केली होती, मात्र ही मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावली होती.
आता या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मोठे विधान केले आहे ते म्हणाले "मोदी सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य व अर्थकारण याचा मेळ घालून पुढे जावे लागेल. 

                   आमदार  रोहित पवार 

सध्या अहमदनगरमध्येही कोरोना चाचण्या वाढवलेल्या आहेत.मात्र अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याची गरज नाही असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोणी लोकप्रतिनिधी लॉकडाऊनची मागणी करत असेल तर त्यांना केंद्र सरकारचा निर्णय मान्य नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो,असा सवाल रोहित पवार यांनी विचारात खासदार सुजय विखे यांना टोलाही लगावला आहे.
             खासदार  डाॅ. सुजय विखे 

खासदार विखे हे भाजपचे खासदार असून ते प्रशासनावर आरोप करत नगरमध्ये पूर्ण लॉकडाऊनची मागणी वारंवार करत आहेत. त्यावर आमदार पवार यांनी लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगत प्रशासनाची बाजू घेतली आहे.
close