shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुरूड तालुक्यातील वळके ग्राम पंचायत हद्दीत बॅनर फाडले..!!

मुरूड । प्रतिनिधी ( विकास मेहेतर ):

मुरूड- रायगड : मुरूड तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत वळके हद्दीमधील शासनाच्या नियमांचे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमानी यांच्यासाठी जन जागृती करणारे लावण्यात आलेले बॅनर काही विरोधी समाज कंटकांनी फाडले.

वास्तविक ही घटना अशी की  दिनांक 12/8/2020 रोजी   ग्राम पंचायत वळके यांच्या माध्यमातून कर्तव्यशील  युवासरपंच मा.श्री. किशोर नथुराम काजारे यांच्या नेतृत्वाखाली येसदे , शिरगाव , वळके , सतिर्डे , ताडगाव बुद्धावाडी आणि ताडवाडी या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या चाकरमानी यांच्यासाठी शासनाने जाहीर केलेली नियमावली यांचा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होत. त्यामधील   ताडगाव गावाजवळील लावण्यात आलेला बॅनर काही विरोधी समाज कंटकांकडून फाडण्यात आले. सदरची घटना ही दिनांक 13/8/2020 रोजी घडली असून , ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय असून मा.सरपंच किशोर नथुराम काजारे यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला असून विरोधकांना एकच सांगणं आहे की , जे पण काही नियम लागू झाले आहेत, ते संपूर्ण रायगड साठी लागू झाले आहेत, आणि ग्राम पंचायत वळके हद्दीत येणाऱ्या ७ गावांच्या दिनांक २ ऑगष्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये मध्ये सर्व जनतेच्या समोर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रकानुसार जे नियम लागू झालेत त्या बद्दल माहिती देण्यात आली असून सुद्धा काही विरोधी समाज कंटकांकडून हे कृत्य करण्यात आलं आहे.

 अशी माहिती मा.सरपंचांकडून मिळाली असून झालेल्या कृत्याचे निषेध व्यक्त करण्यात आले. त्यानंतर विरोधकांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केलात तरी माझ्या हातून चांगलंच काम होत जाणार आहे आणि आपण दाखविलेल्या धाडसाबद्दल आपलं अभिनंदन..
close