हिंगोली । प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख) :
दि.१३,मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धनगर समाजाला एस.टी.प्रवर्ग आरक्षाणाची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दि.१३आँगस्ट गुरुवार रोजी सेनगांव तालुक्यातील धनगर समाज बांधवाकडुन सेनगांव तहसिलदार यांना रक्तलिखीत निवेदन देण्यात आले आहे.
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे. शासन निर्णयानुसार घोषीत केलेल्या २२योजनेची अमलबजावणी करण्यात यावी. त्यासाठी एक हजार कोटीची तरतुद करावी मेंढपाळ बांधवावर होणारे हल्ले थांबवुन त्यांना संरक्षण देण्याची मागणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी दिनी धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य सेनगांव तालुका समन्वयक माजी पं.स.सदस्य विकास शिंदे, राज्य मल्हार संघटनेचे सेनगांव तालुकाध्यक्ष गंगारामजी फटागंळे,पं.स. उपसभापती रविंद्र गडदे, संजय चिलगर, सुनिलभैया शिंदे,सचिन हराळ, घनश्याम हराळ,आत्माराम कुंदर्गे,भागवतराव बेंगाळ,रवि लांडे,विठ्ठल कुंडगीर आदी समाजबांधवानी निवेदन देऊन मागणी केली.