shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काळेवाडी येथे होंडा सिटी आणि दुचाकीचे अपघात... अपघातग्रस्तांनाजनसामान्यचे नेतृत्व मा.राजवर्धनदादा पाटील यांनी ॲम्बुलन्स ची वाट न पाहता स्वतःच्या गाडीतून नेले रुग्णालयात..!!


इंदापूर। प्रतिनिधी (तात्याराम पवार )➤
काळेवाडी येथे शुक्रवार दिनांक १४/८/२० रोजी इंदापूर वरुन भिगवणला हायवेवरुन येत असताना काळेवाडी या ठिकाणी होंडा सिटी आणि दुचाकीचे अपघात झालेला पाहीला.
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री राजवर्धनदादा पाटील यांनी अत्यंत तत्परतेने गाडी उभी करुन ॲब्युलस ला फोन लावला परंतु ॲब्युलस ला येण्यास उशीर लागेल हे समजताच दादा यांनी कोणतेही वेळ न लावता दोन्ही अपघात ग्रस्तांना आपल्या स्वताच्या गाडीत भिगवण येथील थोरात हाॅस्पिटल येथे घेवुन आले .दादानी दाखवलेल्या संवेदनशीलते मुळे त्यांचे प्राण वाचले. रोजच्या भेटीच्या दौरा करीत असताना या कार्याकडे न पाहता त्यांनी सदर घटनेची तातडीने दखल घेऊन जे कार्य केले त्या कार्याची दखल समाजात घेण्यासारखी आहे.

 नेहमीच रोज सुखदुःखात सामील होणारे राजवर्धन दादा आज प्रत्यक्षात मदत करताना लोकांनी पाहिले. यातूनच लोकांच्या मनात जास्त प्रमाणात दादांचे कार्य रुजले जाणार यात शंकाच नाही. त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक होत असल्याचे दिसत आहे .आज त्यांच्याकडे जनसामान्यांचे काळजी घेणारे नेतृत्व म्हणूनही पाहिले जात आहे.
close