shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यातील पेन्शनर लोकांचा प्रश्न तात्काळ सोडविल्याबद्दल मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हार्दिक आभार - आप्पासाहेब ढूस..!


देवळाली प्रवरा - दि. 17 ऑगस्ट :
राज्यातील पेन्शनर लोकांच्या इन्कमटॅक्स डिटेल्स आणि दिडक्शन सर्टिफिकेट च्या समस्यांबाबत  मुख्यमंत्री मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना केलेली मागणी मान्य केल्याबद्दल आप्पासाहेब ढूस यांनी आभार व्यक्त करून धन्यवाद दिले..राज्यातील पेन्शनर मंडळींना प्रतिवर्षी इन्कमटॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी मागील आर्थिक वर्षाचे इन्कमटॅक्स डिटेल्स आणि  इन्कमटॅक्स दिडक्शन सर्टिफिकेट ची आवश्यकता असते. 

जे त्यांना या वयात प्रत्यक्ष कोषागार कार्यालयात जाऊन मिळवावे लागतात. हे निश्चितच कठीण आहे व तेही इंटरनेट च्या युगात.तसेच दरवर्षी द्यावं लागणारं “हयात प्रमाणपत्र” मागील दोनेक वर्षापासून ऑनलाईन सादर करता येतं. त्याप्रमाणेच समस्त कोषागार कार्यालयांनी इन्कमटॅक्स डिटेल्स आणि  इन्कमटॅक्स दिडक्शन जर राज्याच्या पोर्टलवर टाकले तर गरजूंना आपला PPO क्रमांक  टाकून वा इतर प्रकारे सहज उपलब्ध होऊ शकेल व इन्कमटॅक्स रिटर्न्स वेळेवर दाखल करता येतील.म्हणून राज्यातील समस्त  पेन्शनर मंडळींचे इन्कमटॅक्स डिटेल्स आणि इन्कमटॅक्स दिडक्शन सर्टिफिकेट कोषागार कार्यालयांने यापुढे पोर्टल वर प्रसिद्ध करणे कामी संबंधित विभागाला योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा ना श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचेकडे दि. 5 जुलै 2020 रोजी ई मेल द्वारे  विनंती केली होती. 

आप्पासाहेब ढूस यांच्या विनंती नुसार महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर शासनाने माहिती उपलब्ध करून दिली असून संकेतस्थळाद्वारे निवृत्तीवेतनधारकांना आता  निवृत्तीवेतनाचा तपशील समजणार आहे.अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांच्या निवृत्ती वेतनाचा तपशील.

www.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून सर्व निवृत्तीवेतन धारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना आपला हा तपशील जाणून घेता येईल, अशी माहिती अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी आपला निवृत्ती / कुटुंब निवृत्तीवेतन विषयक तपशील जाणून घेण्यासाठी  www.mahakosh.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर NIVRUTIVETANVAHINI    या टॅबवर क्लिक करावे असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर लॉगिन करण्याकरिता युजरनेम PENSIONER  असे टाईप करावे. पासवर्ड ifms123  असा आहे. कॅपचा टाईप केल्यानंतर लॉगिन करावे.  

लॉगिन झाल्यानंतर स्क्रीनवर वर्क लिस्ट व पेन्शर्नर कॉर्नर रिपोर्ट  असे दोन टॅब दिसून येतात. पेन्शर्नर कॉर्नर रिपोर्ट वर क्लिक केल्यास निवृत्तीवेतनाची अचूक माहिती भरून निवृत्तीवेतन धारकाला त्याचे दरमहा किती निवृत्तीवेतन दिले जाते याची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
वर्कलिस्ट टॅब वर क्लिक केल्यास क्रियेट पेन्शनर युजर या टॅब वर क्लिक करून निवृत्तीवेतन धारकास स्वत:चे स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन युजरनेम आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकाने त्यांचा निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक, निवृत्तीवेतन बँक खाते आदी अचूक नोंदवणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनाची अचूक माहिती भरून क्रियेट युजर वर क्लिक केल्यास निवृत्तीवेतन धारकाला स्वत:चे लॉगिन (युजर नेम व पासवर्ड) उपलब्ध होईल. या नवीन युजर नेम आणि पासवर्ड ने लॉगिन केल्यानंतर निवृत्तीवेतनधारकास स्वत:च्या निवृत्तीवेतनाची तपशीलवार माहिती उपलब्ध करून घेता येईल, निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे ही अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळवले आहे.

आमच्या विनंतीस मान देऊन  निवृत्ती वेतन धारकांना ही सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे राज्यातील निवृत्तीवेतधारकांचे वतीने आभार व्यक्त केले.
close