जुन्नर । प्रतिनिधी :
प्रतीक्षा मुव्हीज निर्मित आणि रमेश पवार दिग्दर्शित "बात्तकु," (एक वास्तविकता)
या आपल्या आगामी चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन तसेच आपल्या नवीन ऑफिस चे उदघाटन काल रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2020.रोजी करोडो मनावर अधिराज्य गाजविणारे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत "छत्रपती राजे शिवाजी महाराज यांचे पवित्र जन्मस्थान" अर्थात "शिवनेरी" किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर ह्या ठिकाणी मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
2021 मध्ये आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी एक सुंदर कलाकृती नक्कीच आपल्या सर्वांना भेट देईल.
निर्माती: सौ.अंजना मच्छिंद्र कुसाळकर, प्रतीक्षा मुव्हीज.
कथा-पटकथा-संवाद: रमेश.एस.पवार
दिग्दर्शक: रमेश पवार
सहा.दिग्दर्शक: प्रकाश दळवी. दत्तात्रय घाडगे,
मेकअप- सुजित सुरवसे
या छोटेखानी कार्यक्रमासाठी कोथरूड येथील प्रसिद्ध व्यावसायिक श्री.रमेश आण्णा शिंदे, भोसरीचे नितीन आण्णा धोत्रे, आपल्या शिर्डी एक्सप्रेस चे संपादक रमेशजी जेठे सर,Vicky अण्णा शिंदे, मेकअप आर्टिस्ट सुजित सुरवसे,प्रा.मयूर मिरे,मच्छींद्र कुसाळकर, संतोष चौगुले, शरद चौगुले, सागर चौगुले, OCCI संघटना जिल्हाध्यक्ष प्रकाश ननावरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

