गडचिरोली ता.१६ :- जिल्ह्यात आज १३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर नव्याने ६ कोरोणाबाधित आढळून आले आहे.
आज कोरोणा मुक्त झालेल्यामध्ये सिरोंचा तालुक्यातील ५ , अहेरी व देसाईगंज येथील सीआरपीएफचे ३ जवान, भामरागड तालुक्यातील १ व धानोरा येथील ४ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ६७१ झाली आहे.
आज नव्याने ६ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील २, अहेरी येथील १, आरमोरी येथील २ आणि गडचिरोली येथील एका रुग्णाचा समावेश आहे. हेडरी येथे नव्याने आढळलेले दोन रुग्ण हे पूर्वी पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. अहेरी येथील रुग्ण हा मंचेरियल येथून आलेला असून, तो विलगीकरणात होता. आरमोरी येथील दोन रुग्ण हे औरंगाबाद येथून आलेले असून, ते देखील विलगीकरणात होते. गडचिरोली येथे आढळून आलेला रुग्ण हा गुजरातवरुन आलेला आहे. यामध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधीत्याची संख्या ८२३ झाली आहे. त्यापैकी सध्या सक्रिय १५१ आहे तर ६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

