shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अण्णाभाऊंनी उपेक्षित समाजाला दिशा देण्याचे काम केले.... अ‍ॅड. सुरेशजी मोकळ..!!



शिर्डी ।  प्रतिनिधी कु. किरण जाधव ➤  
अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरी व झुंजार लेखनीतून प्रबोधनातून परिवर्तन करून उपेक्षित समाजाला दिशा देण्याचे काम केले असे प्रतिपादन अ‍ॅड. सुरेशजी मोकळ यांनी केले.



राष्ट्रीय लहुजी सेना व दलित साहित्य संमेलन कमेटीचे वतीने अण्णाभाऊं साठे जन्मशताब्दी वर्षानिमीत्त आयोजित व्याख्यान मालेचे पहिले पुष्प गुंफतांना केले. ते पुढे म्हणाले की वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करून मुंबईत गिरणी कामगार म्हणुन कारकिर्दीला सुरवात करतांना कामगारांच्या समस्या असो अगर सयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो त्यासाठी त्यांनी त्यांची लेखणी झिझवली महाराष्ट्राला मुंबई मिळवुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.इतकेच नव्हे तर दिड दिवस शाळा शिकलेला माणुस पुढे रशियाला त्याच्या कर्तुत्वावर जातो.आणि रशियाकरांची मने जिंकतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती अंताच्या लाढाने आणि विचारांच्या प्रभावाने ते आंबेडकरांच्या विचारांचे झाले.पुढे त्यानी शोषित पिडीत उपेक्षित समाजासाठी काम करून समजा पुढे आदर्श ठेवला.यावेळी अॅङ मोकळ यांनी जुन्या,रुढी परंपरा आणि म्हणीचा  समाचार घेताना सांगीतले 'भेटेल  मांग तर फिटेल पांग ' हि जर म्हण प्रत्यक्षात उतरवायची आसेल तर या देशाचा पंतप्रधान  मांगाला करा म्हणजे देशाचे पांग फिटेल नाही तर हि म्हण फक्त मांगाने आमवश्या व पोतराजाने अंगावर साठ मारुन घेण्यापुरती मर्यादीत राहिल असे ते म्हणाले पाहूण्यांचा परिचय व प्रस्ताविक बाळासाहेब नेटके यांनी केले आभार परशुराम साळवे (जिल्हाध्यक्ष लहुजी सेना,अध्यक्ष दलित साहित्य संमेलन आयोजक कमेटी) यांनी मानले या प्रसंगी दिनेश आरणे, दतु खैरणार आदि.
close