इंदापूर। प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
वरकुटे खुर्द येथील वृक्षमित्र श्री सचिन मारुती मासाळ यांनी मान्यवरांच्या हस्ते संकल्पपूर्वक विविध वृक्षांची रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचे कार्य ही जगातील पर्यावरण प्रेमींसाठी प्रेरणादायी ठरले आहे .त्यांच्या शेती च्या प्रत्येक बांधावर अनेक प्रकारची निरनिराळी उत्तम झाडे चांगल्या स्वरूपात संगोपन करण्याचे वास्तविक कार्य ही त्यांच्या जीवनातील खरी किमया आहे .भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मान्यवर द्वारे त्यांनी संकल्पपूर्वक झाड लावले आहेत .तसेच आलेल्या प्रत्येकक मान्यवर यांना एक झाड भेट म्हणूनही दिली आहे. अशा मान्यवरांचा अभिप्राय ची नोंद वही त्यांच्याकडे आहे कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्या कुटुंबाच्या घरी त्या मुलीच्या प्रेरणेसाठी एक झाड लावून त्यांना शुभेच्छा देण्याचे हे अनोखे सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून चालू आहे .वृक्ष मित्र म्हणून त्यांना अनेक संस्थांनी गौरवले आहे . तसेच त्यांना वृक्षमित्र हा पुरस्कारही मिळालेला आहे.
खरेच इंदापूर तालुक्यात वृक्ष मित्र म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वा तून सिद्ध करून दाखविले त्यांचे हे कार्य अभिमानास्पद वाटणारे आहे. त्यांच्या या कार्याचे विशेष कार्य कौतुक अवघ्या परिसरातून लोकांच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून येत आहे . त्यांना विशेष सहकार्य म्हणजे त्यांचे वडील यांचेही सहकार्य त्यांच्या पाठीशी असल्याने उत्कृष्ट अशी शेती शेळीपालन व दुग्ध व्यवसाय अतिशय योग्य अशा रीतीने चालू योग्य विचार आणि सुंदर नियोजन याच्या जोरावरती ते प्रगतशील बागायतदार म्हणूनही प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडे द्राक्षी ,पेरू ,डाळिंब व इतर नगदी पिके अतिशय चांगल्या प्रकारे आहेत.त्यांचा आदर्श प्रत्येक वृक्षप्रेमी यांनी घ्यावा असे हेवा वाटावा असा उपक्रम त्यांनी राबवला आहे त्यांनी भेटीस आलेल्या पाहुण्यांना अधिकारी मुलींचे वाढदिवस मुलगी जन्माला येईल त्या ठिकाणी वृक्ष भेट देऊन वृक्ष लावणे.
अशा पद्धतीने आत्तापर्यंत दहा हजार झाडे लावून झाले आहेत लवकरच 10001 या झाड लावण्याचे नियोजन मोठ्या नियोजनातून करण्यात येणार आहे .असे त्यांनी आपले मत व्यक्त केले . त्यांच्या या कार्याची अतिशय प्रामाणिकपणे दखल घेतली जात असून, आजही त्यांच्याकडे डॉक्टर ,तहसीलदार ,शेती अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार इत्यादी मान्यवर भेटीला येत आहेत. त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक केले जात आहे.
स्वर्गीय पद्मिनी राजाराम डोंबाळे त्यांची आत्या कर्मचारी वनपरिक्षेत्र विभाग इंदापूर यांच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली पाच भावाच्या नावाने त्यांनी वीस वर्षांपूर्वी पाच सागाची झाडे लावली होती. त्यातून सचिन मासाळ यांनी प्रेरणा घेतली हे कार्य 14 डिसेंबर 2008 साला पासून सुरू केले व थोरले बंधू मार्गदर्शक गुरु माननीय श्री प्रताप राज मारुती मासाळ वित्त व लेखाधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून सतत मार्गदर्शन होत असते .या कार्यातून समाजातील युवकांनी वेगवेगळ्या संस्थांनी असा बोध घ्यावा की मानवी जीवना बरोबर नैसर्गिक जीवन सुद्धा खूप महत्त्वाचे असते आणि त्याला जतन करण्याचं काम हे वृक्ष लावून पर्यावरणाचा समतोल संतुलित राहावा यासाठी करावे हे त्यांचे मत आहे.
या कार्यात त्यांची आई वडील पत्नी मुले सर्व मित्र परिवार सहभागी असतात.
झाडे लावा झाडे जगवा .
मुलगी वाचवा देश वाचवा.
जय हिंद ,जय महाराष्ट्र .
जय वनराज.🏝️🏝️



