shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची आमदार तानाजी मुटकुळें यांनी केली बांधावर जाऊन पाहणी..!!

हिंगोली । प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)➤ 
दि.२६,हिंगोली जिल्ह्यात सतत १४ दिवसपासुन संततधार पाऊस सुरू असून या अतिवृष्टीमुळे सेनगांवतालुक्यातील लिंबाळातांडा,शिंदेवाडी,खैरखेडा,पानकनेरगांव,वाढोना,शेगांव,सावरखेडा,वाघजाळी,
म्हाळशी व इतर गावातील तोडणीस आलेले मुग हे पिक जागीच जळून गेले तर सोयाबीन वर झालेल्या आंथेक्लोज या रोगामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आज दि.२६ आँगस्ट बुधवार रोजी हिंगोली विधानसभेचे आ.तानाजीराव मुटकुळे यांनी लिंबाळा,लिंबाळा तांडा,खैरखेडा,शिंदेवाडी या गावच्या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.



तसेच सेनगांवचे तहसीलदार,तलाठी यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले यावेळी उपस्थित आमदार तानाजीराव मुटकुळे,सेनगांव भाजपा तालुकाध्यक्ष अशोकजी ठेंगल,जिल्हा सरचिटणीस शंकरराव बोरुडे,जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम गडदे, तालुका संघटक सरचिटणीस श्रीरंग राठोड,सरचिटणीस गजानन नायक,गुलाबराव गडदे  व सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
close