shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या करणार्‍या युवकाचे पत्रकार आणि फौजदाराने वाचविले प्राण..!!

हिंगोली ।  प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२६,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील शिंदेफळ येथील एक ३५ वर्षीय तरुण आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास फेसबुकवर लाईव्ह येत आत्महत्या करण्याच्या तयारीत असतांनाच हि बाब पत्रकार मनिष खरात यांच्या लक्षात येताच त्यांनी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार शिवसांब घेवारे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करुन सुचना देताच क्षणाचा विलंब न लावता घेवारे यांनी सुत्रे हलवत त्या भागातील पोलीसांना व नागरिकांना घटनास्थळी पाठविले.पोलीसांच्या सतर्कतेमुळे त्या युवकाचे प्राण वाचल्याने पोलीस खरंच जनतेसाठी २४ घंटे सतर्क असल्याचे दिसून आले. 

आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक संतोष वाठोरे

अधिक माहिती अशी की,सेनगांव तालुक्यातील शिंदेफळ येथील हाँटेल व्यवसायीक ३५ वर्षीय संतोष वाठोरे हा मागील तीन दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता तो आज दि.२६ आँगस्ट बुधवार रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ करुन साँरी मित्रानों  आता सर्व काही संपले असा मँसेज टाकत रडत होता याचवेळेस त्याचा फेसबुक मित्र असलेले पत्रकार मनीष खरात यांनी त्या युवकाच्या फेसबुक लाईव्ह व्हिडिओ वर कंमेट टाकुन कारण विचारले असता तो म्हणत होता सर आता सर्व संपले जे काही आहे ते आता फेसबुक लाईव्ह मध्येच बघा त्यामुळे पत्रकार खरात यांनी हि बाब स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांना तात्काळ संपर्क साधत सदरील युवकाच्या फेसबुक ची लिंक व फोन नंबर व्हाँट्सएप ला शेयर केली क्षणाचा विलंब लावता फौजदार घेवारे यांनी त्या युवकाचे लोकेशन ट्रेड केले तसेच अजुन काही मित्रानां फोन करून त्याचा शोध घेण्यास सांगितले.घेवारे हे घटनास्थळाकडे रवाना झाले तोपर्यंत पोलीसांचे गतिमान पथक घटनास्थळी पोहचले होते.फौजदार घेवारे यांनी अवघ्या १५ मिनिंटात हे आँपरेशन यशस्वी केले.घेवारे यांनी मित्रांच्या सहाय्याने त्या आत्महत्या करणार्‍या युवकाला आत्महत्येपासुन परावृत करुन त्याचे प्राण वाचविले.

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे


पत्रकार मनिष खरात

या उत्कृष्ट कामगिरीमुळे हिंगोली पोलीस प्रशासन पुन्हा नावारुपाला आले आहे.त्या युवकाच्या नातेवाईकांनी पत्रकार मनिष खरात व पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
close