shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

३१ ऑगस्ट रोजी भवरवाडी येथे भटके विमुक्त दिनाचे आयोजन...!!

प्रतिनिधी। मोहन शेगर:
जामखेड :- ग्रामीण विकास केंद्र जामखेड व लोकाधिकार आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथे भटके विमुक्त दिनानिमित्त प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक 
ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी दिली.

पाटोदयाचे सरपंच समीर पठाण यांच्या अध्यक्षतेखाली व जामखेडचे कर्तव्यदक्ष तहसिलदार विशाल नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या प्रबोधन मेळाव्यास जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक मोहन पवार, संदिप गायकवाड, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, महिला अध्यक्षा द्वारका पवार, नाथपंथी डवरी गोसावी समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भीमराव चव्हाण, नाथपंथी डवरी गोसावी संघटनेचे तालुकाध्यक्ष आजिनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथील सेटलमेंट मधून समस्त भटके विमुक्तांची सुटका केली. आणि भटके विमुक्त खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले. तेव्हापासून ३१ ऑगस्ट हा भटके विमुक्त दिन भारतभर साजरा केला जातो.  ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या वतीने दरवर्षी भटके विमुक्त दिन विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जातो. यावर्षी देशात कोरोना महामारी व लॉक डाऊनचे संकट असल्यामुळे भटके विमुक्त मोठ्या अडचणीत आहेत. 

यापरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण विकास केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने कोरो मुंबई, इकोनेट पुणे, जीवदया फौंडेशन या संस्थेच्या सहकार्याने जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, दौंड, शिरूर या ५ तालुक्यातील सुमारे ५ हजार कुटुंबाना एप्रिल ते ऑगस्ट या ५ महिन्याच्या कालावधीत प्रत्येक कुटुंबाला महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.

९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड ततालुक्यातील काजेवाडी परिसरातील पवारवस्तीवर जाऊन २५ पारधी कुटुंबाना अन्नधान्य, किराणा वाटप केले. तसेच आदिवासी दिन साजरा केला. त्याच धर्तीवर ३१ ऑगस्ट या भटके विमुक्त दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथील ५२ नाथपंथी डवरी गोसावी समाजातील कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य व किराणा वाटप केले. भवर वाडी येथे नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे ६० कुटुंबे असून त्यातील निम्मे कुटुंब अनेक दिवसांपासून ३ बांबूच्या पालामध्ये राहतात. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे.

भटके विमुक्तांना अन्नधान्य व किराणा वाटपाबरोबरच त्यांचे प्रबोधन ही केले पाहिजे तसेच त्यांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा, या मूलभूत सोई सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यासाठी स्थानिक प्रशासन व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून हे काम केले जाते. म्हणूनच ३१ ऑगस्ट २०२० रोजी भवरवाडी येथे जामखेड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे हे भटके विमुक्तांचे प्रबोधन करणार आहेत. 

ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष ॲड.डॉ.अरुण जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजिनाथ केसकर, ग्रामीण विकास केंद्राचे प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत, कार्यालयीन मदतनीस राकेश साळवे नाथपंथी डवरी गोसावी समाजातील तरुण तडफदार कार्यकर्ते संतोष चव्हाण, भीमराव शेगर, भाऊराव सावंत, सूर्यभान सावंत, शंकर शेगर, साहेबराव सावंत, अरुण शिंदे, प्रकाश शेगर, संतोष शिंदे, बाबाजी चव्हाण, मोहन शिंदे, संतोष शेगर, नामदेव सावंत, सागर चव्हाण, राजेंद्र सावंत आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
close