shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा मंदिरासह राज्यातील इतर धार्मिकस्थळे त्वरित खुली करण्यात यावी यासाठी शिर्डीत घंटानाद आंदोलन..!!

सावळीविहीर(प्रतिनिधी) :
कोरोनामुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे गेल्या साडे पाच महिन्यापासून बंद आहेत.त्यामुळे धार्मिक स्थळे असणाऱ्या शहरां मधील गावांमधील आर्थिक व्यवहार पूर्ण आजपर्यंत ठप्प आहे.महाराष्ट्रा बाहेरील इतर काही राज्यात धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे अजूनही बंद आहेत. तेव्हा ही धार्मिक स्थळे त्वरित सुरू करावीत.

यासाठी अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी व राज्यांमध्ये घंटानाद आंदोलन तसेच दार उघड उद्धवा दार उघड असे आंदोलन आज दि,२९ शनिवारी रोजी सकाळी अकरा वाजे नंतर करण्यात आले. शिर्डी व परिसरातही हे आंदोलन करण्यात आले, शिर्डीचे साईबाबा मंदिर उघडावे म्हणून शिर्डी मध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे कोरोणामुळे सध्या बंद आहेत. गेली साडे पाच महिन्यापासून सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत,). शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर गेल्या 17 मार्च दुपारी तीन वाजेपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. शिर्डीचे श्री साईबाबा मंदिरासह राज्यातील सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे खुले करण्यात यावीत.अशी मागणी अध्यात्मीक  समन्वय आघाडी यांनी केली होती व आज 29 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 11 वाजता गावागावात या आघाडी तर्फे दार उघड उध्दवा दार उघड! असे आंदोलन करून घंटानाद करण्याचे असे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे शिर्डी व परिसरातही हे आंदोलन करण्यात आले.

 शिर्डी मध्ये  मा, नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.म्रुदंग, वीना, टाळ,वाजवीत व भजन गात घंटानाद आंदोलन येथे मंदिर परिसराबाहेर करण्यात आले.अनेकाच्या हातात 'दार उघड उध्दवा, दार उघड' असे फलक होते. त्याचप्रमाणे राहता येथे व परिसरातील अनेक गावात घंटानाद करून हे आंदोलन करण्यात आले. शिर्डी मध्ये श्री साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे.अशी मागणी करण्यात आली. शिर्डीमध्ये हॉटेल, लॉज ,रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्स ,हार प्रसादाची दुकाने व सर्व जनजीवन साईबाबा व साईभक्तांना वर अवलंबून आहे. मात्र हे मंदिर बंद असल्यामुळे येथील आर्थिक व्यवहार पूर्ण ठप्प झाला असून साईबाबाचे मंदिर खुले करावे. त्यामुळे येथील आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल.


अशी मागणी या घंटानाद आंदोलनाच्या वेळी शिर्डीत करण्यात आली. यावेळी धार्मिक व अनेक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सोशल डिस्टंन्स पाळून व मास्क बांधून आंदोलनासाठी उपस्थित होते. या आदोलनाच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिर्डीसह सावळीविहिर व परिसरातही घंटानाद आंदोलन करण्यात आले.
close