नागपूर :
बार्टी, सारथीच्या धर्तीवर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी राज्य शासनाने 'महाज्योती' या स्वायत्त संस्थेची स्थापना केली. माञ संस्थेला वर्ष उलटूनही या संस्थेसाठी ना निधीची तरतूद झाली ना पदभरती करून यंञना कार्यान्वित झाली. त्यामुळे महाज्योती वर्षभरापासून कागदावरच रखडली असून यामुळे भटके-विमुक्त विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. असे भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक प्राध्यापक श्रीकांत मुद्दे म्हणाले.
महाज्योती मध्ये सामाजिक भान असणारे तिन्ही समूहाचे प्रतिनिधी यात घेणे अपेक्षित होते मात्र कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, यांच्याकडून जे प्रतिनिधी दिले ते फक्त ओबीसी समूहाचे आहे त्यामुळे भटक्या विमुक किंवा एस बी सी चे प्रश्न कोण सोडवतील हा प्रश्न भटक्या विमुक्त समूहाच्या संघटनांनी केला आहे व त्यांच्यात सरकारविरोधी सूर जोरात बाहेर पडतानी दिसत आहे ,, पुढील काळात मोठे निदर्शने करण्यात येईल असा इशारा भटक्या विमुक्त संघटनांनी दिला आहे .
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत तयारी करता यावी, उच्च शिक्षण घेता यावे यासाठी पुण्यात बार्टी (डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) उत्तम काम करीत आहे. त्याच प्रमाणे सारथी (राजर्षी छञपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था) या संस्था काम करत आहेत. नागपुरात कार्यालय ही उघडले आहे मात्र अजूनही भटक्या विमुक्त समूह च्या विध्यर्थीना लाभ मिळताना दिसला नाही अजूनही कार्यालय आपली दिशा ठरवू शकत नाही असे दिसत आहे. शासन आणि प्रशासनाच्या खेळात मात्र अद्यापही ज्यांच्यापर्यंत घटनात्मक सोयी-सुविधांचा लाभ पोहोचला नाही असा घटक म्हणजे विमुक्त-भटके समूदाय होय. भटके-विमुक्त जाती-जमातीमधील उच्च शिक्षण सुकर व्हावे यासाठी महाज्योती संस्था मागील वर्षी ९ आँगस्ट रोजी स्थापन करण्यात आली. या माध्यमातून भटके-विमुक्त विद्यार्थ्यांना एमपीएससी, युपीएससी, नीट, जेईई, पीएच्.डी. आदींसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. माञ संस्थेच्या स्थापनेनंतर काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका लागल्या, सरकार बदलले, त्यानंतर लगेच कोरोनाचे संकट राज्यावर ओढवले. या सर्व घडामोडींमध्ये शासनाचे महाज्योतीचा कारभार सुरळीत सुरू करण्याकडे दुर्लक्ष झाले.
महाज्योती संस्थेच्या स्थापनेला वर्ष उलटून गेल्यानंतरही जैसे थे स्थिती आहे. भटके-विमुक्त विद्यार्थ्यांना आजतागायत कुठलाही लाभ मिळालेला नसल्याने ही संस्थाच बंद पाडण्याचा डाव तर नाही ना, अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे शिक्षण तरी कसे घेणार, तसेच शैक्षणिक कर्ज देण्यासही बँका टाळाटाळ करत आहेत. असे अनेक प्रश्न विद्यार्थी व्यक्त करत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी हवालदिल झाले आहेत; असे मुख्यमंञ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. असे भटके-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.

