shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजगुरुनगर नगरपरिषद व जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांच्या वादात रस्ता अडकला... खराब रस्त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल..!!

राजगुरुनगर । प्रतिनिधी (विद्याधर साळवे)➤
राजगुरुनगर मधील तिन्हेवाडी रोड येथील वाळूंजस्थळ ते समृद्धीनगर हा खराब रस्ता दुरुस्त व्हा वा या मागणीसाठी खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजगुरुनगर नगर परिषदेत मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांना घेराव घालून खराब रस्त्याचा जाब विचारून आंदोलन करण्यात आले.राजगुरुनगर तिन्हे वाडी रोड येथील वाळुंजस्थळ ते समृद्धीनगर हा रस्ता राजगुरुनगर नगर परिषद व जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांच्या वादात अडकला असून सध्या ऐन पावसाळ्यात या खराब झालेल्या रस्त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अन्यथा खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजगुरुनगर नगर परिषदेत मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांनी दिला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2020 रोजी राजगुरुनगर नगरपरिषदेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांना म.न.से. जिल्हाध्यक्ष समीर थीगळे, मनोज खराबी, मंगेश सावंत , सोपानराव डुंबरे, आदित्य शिर्के व कार्यकर्त्यांनी घेराव घालून आंदोलन करुन खराब रस्त्याचा जाब विचारण्यात आला.येत्या पंधरा दिवसात या रस्त्याबाबत माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी उपस्थित म.न. से. पदाधिकाऱ्यांना दिले.
--------------------------------------------------------------------------------
close