shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुर मध्ये इंडिया गेट ..!!


माजी उपनगराध्यक्ष मा. श्री.अरविंद तात्या वाघ  इंदापूर यांच्या संकल्पनेतून साकार...!!!


 इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
इंदापूर देि.३०/०८/२०२० रोजी राधिका रेसिडेन्सी क्लबचे इंडिया गेट पूर्ण केल्याबद्दल माननीय माजी उपनगराध्यक्ष श्री अरविंद तात्या वाघ यांच्या हस्ते गेटचे वास्तू शिल्पकार व इंदापूरचे श्री बाबासाहेब विटेकर व श्री अनिल ज्ञानदेव चौगुले यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या गेटचे काम दिनांक 27 जून दोन हजार वीस पासून चालू करण्यात आले होते सदर काम तीस ऑगस्ट 2020 रोजी पूर्ण करण्यात आले भारतातील प्रसिद्ध असे इंडिया गेट याची जवळ जवळ मिनी प्रतिकृती अरविंद तात्या वाघ यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली या वास्तू शिल्पाचे संपूर्ण काम विटेकर व चौगुले यांनी अतिशय प्रामाणिक व उत्साहाने पूर्ण केले या कामाचे विशेष कौतुक तात्यांनी सत्कार रूपातून करून दाखवले आहे या वेळी आपले मेंबर परिवाराचे नेते अनिल पवार यांनी म्हटले आहे की इंदापूरच्या वैभवा मध्ये आता राधिका रेसिडेन्सी क्लब चे इंडिया गेट याचाही समावेश झालेला दिसत आहे खरंच भारतातील सौंदर्य दिल्ली येथील इंडिया गेट आज इंदापुर मध्ये काही स्वरूपात पाहायला मिळवून दिले ते या सामाजिक बांधिलकी जपणारे कर्तृत्व शील नेतृत्व व इंदापूर विचार मंथन परिवारचे श्री अरविंद तात्या वाघ यांनी.

 तात्या इंदापूरच्या जनतेला एक आदर्शवत  म्हणून ओळखले जात आहेत .त्यांच्या या संकल्पनेला इंदापूर मधील ग्रामदैवत इंद्रेश्वर मंदिर ,बालाजी मंदिर ,कृष्ण मंदिर यांचे शिल्प तयार करणारे शिल्पकार श्री बाबासाहेब विटेकर व अनिल चौगुले यांनी साकार करण्यास प्रत्यक्ष मदत केल्या बद्दल त्यांचा सत्कार तात्या यांनी केला .यावेळी श्री विशाल चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
close