केज । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) :-
काल केज शहरात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण दगावला असतानाच,केज शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतच आहे. काल तब्बल ९५ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
शिवाजी हजारे, नगरसेवक
दुपार पर्यंत पाठवलेल्या ४३ स्वॅब पैकी ११ रूग्ण पाॅझिटिव्ह निघाले आहेत. अजूनही कालच्याच ४२ स्वॅबचे रिपोर्ट येणे बाकी आहेत.. आज आलेले ११ पाॅझिटिव्ह रूग्ण पूढील प्रमाणे.. ७० वर्षीय महिला ( रा.गोपाळवस्ती , कानडीमाळी रोड , केज शहर ) १७ वर्षीय महिला ( रा.समर्थमठ केज शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २२ वर्षीय पुरुप ( रा . समर्थमठ , केज शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४४ वर्षीय महिला ( रा समर्थमठ केज शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४५ वर्षीय पुरुष ( रा.धारुर रोड केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.स्वामी विवेकानंद विद्यामंदीर परिसर केज शहर ) ४० वर्षीय पुरुष ( रा कानडी रोड , वसंत विद्यालय परिसर केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५८ वर्षीय पुरुष ( रा.शाहुनगर , वकीलवाडी , केज शहर ) १६ वर्षीय महिला ( रा.अहिल्यादेवी नगर केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १८ वर्षीय पुरुष ( रा . अहिल्यादेवी नगर केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २० वर्षीय महिला ( रा.अहिल्यादेवी नगर , केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) . केज वासियांनी घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये .बाहेर कामानिमित्त येताना तोंडाला मास्क वापरून वेळोवेळी हात सॅनिटाइजर करावे बबनत. असे आवाहन शिवाजी ( आप्पा) हजारे व रवि ( दादा) अंधारे या नगरसेवकांनी केले आहे.

