shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लातूर शहर डीवायएसपी सचिन सांगळे यांना निलंबित करावे: पत्रकारांची मागणी...!!

लातूर जिल्हा प्रतिनिधी ।  रवि बिजलवाड

ऑगस्ट ०५ / लातूर शहर.:
लातूर शहर डीवायएसपी सचिन सांगळे यांनी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दैनिक प्रभातचे संपादक रघुनाथ बनसोडे यांना अण्णाभाऊ साठे चौकात पोलीस कर्मचारी व समाजबांधवांच्या समोर एकेरी शब्दात अरेरावीची भाषा केली व तू कोण? इथे का आलास, पत्रकार असला तरी इथे थांबायचे नाही. बस गाडीत, गाडीत बसवा याला, असे म्हणून सर्वांसमोर अपमान करून पोलिसांच्या गाडीत डांबून बसवले व शहरात एका आरोपी सारखे फिरवले. हा पत्रकारांचा जाणून बुजून केलेला अपमान आहे, अशीही दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. महामानव अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी व  लोकमान्य गंगाधर  टिळक यांची पुण्यतिथी असताना बातमी करण्यासाठी त्या ठिकाणी पत्रकार बनसोडे उपस्थित होते. 

शहर डीवायएसपी सचिन सांगळे यांनी यापूर्वी लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे व दूरदर्शन टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी दीपरत्न निलंगेकर यांना व अशा अनेक पत्रकारांना अर्वाच्च भाषेत वागणूक दिली आहे ते एवढ्यावर न थांबता काठीनेही मारहाण करतात असेही निवेदनात नमूद केले आहे. सांगळे यांना तात्काळ निलंबित करून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते, पालकमंत्री, पोलीस महासंचालक मुंबई, जिल्हाधिकारी लातूर, जिल्हा पोलिस अधिक्षक लातूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर पत्रकार रघुनाथ बनसोडे, अशोक देडे, नरसिंह घोणे, लिंबराज पन्हाळकर, बालाजी वागलगावे, दीपकरत्न निलंगेकर, अशोक हनवते, ज्ञानेश्वर सागावे, संगम कोटलवार, विष्णू अष्टेकर, दिगंबर तारे, महादेव डोंबे आदीसह अनेक पत्रकारांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
close