shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासगी दवाखान्यांमध्ये न जाता शासकीय कोवीड केअर सेंटरमध्ये घेता आहेत उपचार... इंदापूरचे उपसभापती संजय देहाडे यांचा आदर्श..!!

इंदापूर । प्रतिनिधी तात्याराम पवार:
भिगवन(ता.इंदापूर)दि २६ऑगस्ट 2020 रोजी भिगवन कोवीड केअर सेंटर मध्ये पोंधवडी गावचे शिवछावा मावळा संघटनेचे इंदापूदर तालुका उपाध्यक्ष श्री संजय भोसले यांनी भेट दिली. त्यावेळी इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती श्री संजय देहाडे हे भिगवन कोविढ केअर सेंटर येथे गेली दोन-तीन दिवसापासून उपचारासाठी ऍडमिट झाले आहेत सदर त्यांना भेटीसाठी गेले असता तेथील परिस्थितीचा विचार करता इतर पेशंट व संजय देहाडे यांच्या विचारांमध्ये फरक जाणवला इतर काही रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जाण्यासाठी तयार आहेत परंतु देहाडे यांनी सेंटरचे उद्घाटन केले त्या सेंटर मध्येच आपल्या वरती उपचार व्हावा व तालुक्यातील जनतेने ही खाजगी रुग्णालयात न जाता शासकीय सेंटरमध्ये आपला उपचार करून बरे व्हावे त्यांचा हा विचार समाजा मध्ये आदर्शवत असून त्याची दखल सर्वांनी घेण्यासारखे आहे.

खरंच समाजाची सेवा त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत कार्यक्षम असणारे इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती श्री संजय देहाडे जनतेची सेवा करीत असताना त्यांनाही विषाणूची बाधा झाली तरीही ते न खचता व खाजगी रुग्णालयात न जाता शासकीय सेंटरमधील गोरगरीब जनतेचे मध्ये त्यांना धीर देऊन उपचार घेत असताना दिसत आहेत त्यांच्या या मनाचा मोठेपणा हा त्यांचे व्यक्तिमत्व सिद्ध करतो. डॉक्टर मृदुला जगताप यांनी त्यांच्या या विचारांचे विशेष कौतुक केले भिगवण कोविंड सेंटरमधील रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत तसेच श्री संजय देहाडे दोन चार दिवसांमध्ये बरे होऊन घरी येतील अशी माहिती श्री संजय भोसले यांनी दिली.
close