- खरा तुकाराम तेंव्हाही चालत नव्हता व आत्ताही चालत नाही !
प्रकाश मुंडे । तालुका प्रतिनिधी केज :-
तुकाराम मुंढे सर (IAS, आयुक्त, म.न.पा. नागपूर) यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे बदली.
मा. राधाकृष्णन बी (IAS) नागपूर म.न.पा.चे नवे आयुक्त.
आता नागपूर चा कोरोना (COVID 19) उद्याच बरा होणार बहुतेक ! सर्व पदाधिकारी आता जनतेची आघाडीवर कामं सुद्धा करतील ! आपले रखडलेले कॉन्ट्रॅक्ट मार्गी लावा आता ! नवीन आयुक्त सेटिंग करणारा, ऍडजेस्टमेन्ट करणारा असेल तर बरं, नाही तर त्यांना पण घालावा, शेवटी आपला उल्लू साध्य झालं म्हणजे मिळवलं ! जनतेचा काय? ते जगतात भूल थापांवर ! व त्या पसरवण्यासाठी तुमचे ट्रेन केलेले IT सेल आहेच.. जनतेची कामं झालीच पाहिजे असं काही महत्वाचा थोडच असतं.. महत्वाचं काय तर आपलं जुगाड जमलं पाहिजे ! आपलं नावं झालं पाहिजे, तुकाराम मुंढे आल्यापासून जवळपास सात ते आठ महिन्याचा मोठा खाडा पडला असेल, खूप तंगीत सुरु असेल सगळं, राजकीय नेता असून मिळकत नाही याला काय अर्थ आहे म्हणून आता बदली केली ते बरं केलं, आता निवांत होईल सर्व !
सत्तेत असलेले, विरोधात असलेल्या सर्व पदाधिका-यांचे जोरदार अभिनंदन, आता नागपूरच्या जनतेला काहीच काळजी करायची गरज नाही,
आता सत्तेत असलेले व विरोधात असलेले पदाधिकारी जसे बदली करण्यासाठी एकत्र आले तसे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा एकत्र येतील व शक्तिमान, सुपरमॅन बनून धडाधड कामं करतील.
एक जमतं का ते पाहा नं, मुख्यमंत्री साहेब यांना म्हणावं कशाला दुसऱ्या आयुक्ताला पदभार देता आम्हीच पाहून घेतो म्हणा सर्व.. चार्ज बिर्ज..कारण नवीन आयुक्त आले ते ऐकणारे नाही निघाले तर पुन्हा पंचायत ! कारण सगळेच अधिकारी जी साहेब ! म्हणून वागणारे मिळतील का? यात शंका आहे?
पुन्हा एक करता येईल राज्यात भारतीय प्रशासकीय सेवा व राज्य सेवा प्रशिक्षणानंतर सर्व अधिकाऱ्यांसाठी राज्यकर्त्यांचं गुपचूप कसं ऐकायचं? जी साहेब ! म्हणून नियमात बसत नसेल तरीसुद्धा पदाधिकारी सांगतात नं म्हणून गुमानं कामं कशी करायची? याचे विशेष प्रशिक्षण आयोजित करायला हरकत नाही व याचा अभ्यासक्रम सुद्धा बनवला पाहिजे म्हणजे सर्व कसं आपल्याला हवं तसं सुटसुटीत होईल.
तुकाराम मुंढे साहेब आपण नागपूर ला आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून पालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा वेळेवर कार्यालयात येण्याची व जनतेची वेळेत कामं वेळेत पूर्ण करण्याची सवय लागली होती आता काय आपण गेल्यावर तर चांदीच आहे, मनात लड्डू फुटत असतील पण तुम्ही पदमुक्त होईपर्यंत ते दिसणार नाही तुम्हाला, तुम्ही एकदाचे गेले की आनंदी आनंद गाडे, जिकडे तिकडे चोहीकडे !
जनता संकाटात सुद्धा आपला स्वार्थ साधाला रे . काय बाजी मारली गड्यांनो, जनता जीवन मरणाच्या संकटाच्या दारात उभी असतांनासुद्धा केवळ आपल्या भाक-या नीट भाजता येत नसेल तर अशा बदल्या केल्याच पाहिजेत ! कित्ती मोठा विश्व विक्रम केलात, खूपच ग्रेट.. शाब्बास.. हार्दिक अभिनंदन .
एक मात्र निश्चित "हा हार मारणारा तुकाराम नाही !", ते जिथे जातील तिथे आपल्या कार्याची गाथा अवश्य लिहितील. मा. तुकाराम मुंढे सर आपण लवकर कोरोना मुक्त व्हाववेत व तआपल्या पुढील अशाच शानदार इनिंगसाठी व प्रदीर्घ निरोगी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपण आम्हा नागपूरकर जनतेसाठी घेतलेले कष्ट आम्ही पाहिले आहे त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
✒️ सुधाकर मुंडे नागपूर
मुंडे प्रकाश केज'
मुंडे प्रकाश केज'

