shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोळा सणानिमित्त बैल पूजा घरीच करावी बैलांची मिरवणूक काढण्यात येऊ नये- जिल्हाधिकारी..!!

जळगाव जिल्ह्यामध्ये दिनांक 4 ऑगस्ट 2020 रोजीच्या आदेशान्वये सर्व प्रकारचे राजकीय/ सामाजिक/ सांस्कृतिक/ शैक्षणिक/ धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रम यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच शासन परिपत्रक दिनांक 17 जुलै  2020 नुसार सर्व जनावरांचे  बाजार बंद करण्यात आले आहेत तथापि नागरिकांना जनावरे खरेदी करावयाच्या असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करणे बाबत सूचना देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2020 रोजी" पोळा" या सणाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी बैल पूजा घरीच करावी बैलांची मिरवणूक काढण्यात येऊ नये सार्वजनिक प्रसादाचे वाटप करण्यात येऊ नये तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी
close