shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कांबळे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी योगेश उदगीरकर यांच्या मागणीला यश...!!

लातूर। प्रतिनिधी (रवि बिजलवाड ) :
दि.१७/०८/२०२०
जळकोट तालुक्यातील मोजे येवरी पो.मंगरुळ येथील हरिजन बालाजी कांबळे यांच्यावर चार गावगुंडांनी आमच्या शेतात शेळ्या का चारल्या म्हणून मारहाण केली व ते गंभीर जखमी झाले होते  व उपचारासाठी घेऊन जाता असताना त्यांच्या मुत्यु झाला असून, सदरील प्रकरणाकडे कुठल्याही लोकप्रतिनिधीचा व सामाजिक नेत्यांचे लक्ष नव्हते.

परंतु सध्या परिसरात योगेश उदगीरकर युवा मंच ला प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कुटुंबियाची भेट घेतली व लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. अवघ्या काही तासातच प्रशासनाने दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित दोन आरोपींना सुध्दा लवकरच जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन डी.वाय.एस.पी.यांना समस्त समाजबांधवांना व योगेश उदगीरकर युवा मंच यांना दिले. तर योगेश उदगीरकर युवा मंच यांच्या वतीने डी.वाय.‌एस.पी.मॅडम चे अंंभिनदन ही करण्यात आले.


close