हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१७,येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाल्याने येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहेत नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहें त्यामुळे सेनगाव ते जिंतूर महामार्ग बंद करण्यात येत आहें येलदरीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहें.
त्यामुळे या महामार्गवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे या धरणावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहें लहान लहान मुले देखील सेल्फी फोटो काढायला गर्दी करीत आहेत त्यामुळे जीवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे येलदरी धरण व धरना समोरील नदी पात्राचे ५०० मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहें हे आदेश परभणी च जिल्हाअधिकारी दि .म .मुंगळीकर यांनी आज दि.१७ आँगस्ट मंगळवार रोजी सायंकाळी काढले आहेत दि.१७ आँगस्ट २०२० ते दि.३१ आँगस्ट २०२० पर्यंत मध्यरात्री पर्यन्त लागू राहणार आहेत येलदरी धरण परिसरात आता फोटो काढणे,सेल्फी काढणे यास सक्त मनाई करण्यात आली आहें सदर आदेश शासकीय कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी अधिकारी यांना लागू राहणार नाही बाकी सर्वांना ह्या आदेशानुसार पालन करावे आणि येलदरी धरण परीसरात कोणीही जाऊ नये

