shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री अमोल राजे इंगळे यांना कोविंड युद्धा म्हणून केले सन्मानित..!!!

सामाजिक बांधिलकी व निस्वार्थ व्यक्तिमत्त्वाचा झाला सन्मान..!!!
इंदापूर  प्रतिनिधी तात्याराम पवार :
बाभूळगाव दी. १८
आज पंधरा ऑगस्ट 2020 रोजी भारत सरकार नीती आयोग सी  संलग्न आधार फाउंडेशन द्वारा सामाजिक कार्यकर्ते श्री अमोल राजे इंगळे यांना कोविड योद्धा म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष श्री उमेश ग चाफे व उपाध्यक्ष माधुरीताई गुजराथी. यांनी स्वातंत्र्य दिनाना निमित्त सन्मानपत्र घोषित करून अभिनंदन केले.

श्री अमोल राजे इंगळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत व लॉक डाऊन काळात त्यांनी सर्व स्तरातील लोकांना दिलेला आधार हा मोलाचा ठरला आहे त्यांचे कार्यही निस्वार्थ पणाने व सामाजिक बांधिलकी ने असल्याने हे कार्य महाराष्ट्र मध्ये नावलौकिक ठरलेले या सन्मान पत्रावरून दिसत आहे आजच्या covid-19 परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोरगरीब जनतेसाठी स्वतः मात्र धडपडत असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आज आधार फाउंडेशन च्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार 2020 सन्मानाने गौरवण्यात आले आहे त्यांचे समाजासाठी दिलेले योगदान हे कौतुकास्पद आहे.


बाभूळगाव चे सुपुत्र व प्रगतशील बागायतदार व सामाजिक बांधिलकी जपणारे आपला नेता म्हणून नावलौकिक असणारे माननीय श्री अमोल राजे गुलाब  इंगळे यांनी लहानपणापासूनच शालेय शिक्षण घेताना महापुरुषांच्या जयंती ती मधून प्रेरणा घेऊन समाज व मित्रपरिवार गावातील लहान मोठ्यांना मानसन्मान देऊन आपलंसं करणारी व्यक्ती म्हणजे अमोल राजे इंगळे यांचे वडील श्री गुलाब बाबुराव इंगळे वडील उपर्जित शेती करीत जोड धंदा म्हणून गवंडीकाम करीत होते यातून त्यांनी मोठा मुलगा प्रगतशील बागातदार श्री राजाराम भाऊ इंगळे व अमोल राजे इंगळे या दोन मुलांना आपल्या कष्टावर शिक्षण देऊन त्यांना समाजात कसे वागायचे व समाज आपलंसं कसं करायचं याचं बाळकडू संस्कार या दोघांमध्ये रुजून स्वकर्तृत्व करून आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचे सर्वात मोठे कार्य त्यांच्या वडिलांनी केले. आज रोजी त्यांनी सुरुवातीला 7 एकर जमीन यानंतर त्यांनी स्वतःच्या व मुलांच्या कर्तृत्वावर  35 एकर जमीन घेतली आहे.

इंदापूर येथे शिवराज ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान त्यांनी टाकलेले अमोल राजे यांच्या जडणघडणीत त्यांचे भाऊ राजाराम भाऊ इंगळे यांचे मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळाले.अमोल राजे इंगळे हे इयत्ता अकरावीत असताना कोल्हापूर येथे गंगावेश तालीम मध्ये शारीरिक कसरत करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना तेथे दाखल केले. त्यावेळी त्यांनी संस्काराचा ठेवण काय असते ते त्या तालमीत मध्ये शिकले .गुरु-शिष्य परंपरा व मित्रपरिवार कशा पद्धतीने सांभाळायचा हे खरे संस्कार या तालमीतून शिकण्यास मिळतात असे त्यांचे मत आहे. अमोल राजे तालीम करीत असताना कोल्हापूर येथील लोकांनी माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या तेथील राजकीय वलय याचा त्या ठिकाणी इंदापूर मधील असल्याने राजे यांना विशेष सहकार्य लाभले. यानंतर अमोल राजे सहा वर्षे तालीम करून 2009 रोजी माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या विधानसभा मतदान प्रचारार्थ सहभाग घेतला व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय कार्यक्रमात सहभाग प्रत्यक्ष नोंदवला. इथून पुढे त्यांनी 2009 ते आज पर्यंत बाभूळगाव हे माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या पाठीशी जास्त मताने नेहमी गावातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आघाडीवर ठेवले. 

राजे यांच्या सामाजिक चळवळीतील पहिले आंदोलन 25 डिसेंबर 2016 रोजी सरडेवाडी टोल नाक्यावर स्थानिक लोकांना रोजगार व सवलतीने वाहनांना प्रवास परवाना देण्याचे खरे कार्य करून दाखवले . 2016 मध्ये जिल्हा परिषद च्या निवडणुकीपूर्वी घोंगडी बैठक व युवकांचे संघटन या मध्ये सहभाग नोंदवून गावोगावी बैठका घेतल्या .त्यामुळे 19 डिसेंबर 2016 रोजी काटी वडापुरी जिल्हा परिषद उमेदवारीसाठी लोकांच्या चर्चेतून अमोल राजे इंगळे यांचे नाव उमेदवारी  यादीत येऊ लागले हे त्यांचे पहिले राजकीय यश म्हटले जात आहे. त्यावेळी अमोल राजे यांना उमेदवारी  मिळाले नाही .तरी त्यांनी साहेबांच्या व पक्षाच्या कार्यात विशेष सहभाग म्हणून त्यांनी बाभूळ गावचे अनेक तरुण युवक यांना काँग्रेस पक्षात प्रवेश वडापुरी च्या सभेत करण्यास लावले. व जिल्हा परिषद निवडणुकीत अतिशय प्रभावी कार्य करून दाखवले.2017 साली मे महिन्यात संभाजी महाराज जयंतीनिमित्त बाभूळगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान संकलन केले. 3 जून 2017 रोजी महाराष्ट्रात शेतकरी संप होता त्यावेळी बिजवडी येथे युवा शेतकरी  यांनी मुंडन करून सरकारच्या निषेध नोंदवून संपाला पाठिंबा दिला होता. त्यावेळी  अमोल राजे यांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून युवकांना या आंदोलनासाठी प्रेरित केले होते .

याच काळात वादळी वाऱ्याने फळबागांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते .त्यावेळी त्यांनी लोकांना प्रत्यक्ष घरी व शेतात जाऊन आधार देण्याचे कार्य करून शासनाला तातडीने पंचनामे करून मदत करावी असे आव्हान केले होते. 1 ऑगस्ट 2017 रोजी वडापुरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. 27/ 7 /2017 रोजी स्नेहा अमोल इंगळे त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त बाभूळगाव जिल्हा परिषद शाळेत सर्व विद्यार्थ्यांना वह्या दप्तर पेन गणवेश व खाऊ वाटप करून साजरा केला .यावेळी सभापती करण सिंह घोलप महेंद्र रेडके दीपक जाधव ,सागर भोसले हे पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याच काळात मराठा क्रांती मोर्चा मध्ये युवकांना संघटित करून जंक्शन बारामती पुणे येथे हे युवकांना  प्रत्यक्ष मोर्चा मध्ये दाखल होऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. 21 ऑगस्ट 2017 रोजी माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वडापुरी पंचायत समिती गणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतून प्रत्येक मुलांना एक वृक्ष भेट देऊन साजरा केला व प्रत्यक्ष वृक्षरोपण  केले. 2017 रोजी गणेश उत्सवात जिल्हा परिषद काटी वडापुरी गटात अनेक गणेश उत्सव मंडळाने आरती साठी मान देऊन सन्मान सोहळा ठीक ठिकाणी आयोजित केला . त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतल्याचे यातून लक्षात येते .बाभूळगावात ग्रामस्वच्छता अभियान सप्टेंबर 2017 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व  माध्यमिक विद्यालय यांच्या आणि गावातील युवकांच्या सहभागातून गाव स्वच्छ केले .बाभूळगाव मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त संमोहन नाचा कार्यक्रम डॉक्टर दत्तात्रेय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती व सामाजिक जनजागृती मनोरंजन मानसिक ताण तणाव टेंशन भीती दूर करण्याचे कार्य या वेळी करण्यात आले.दिनांक 29 सप्टेंबर 2017 रोजी बाभूळगाव येथे श्री ग्रामदैवत लक्ष्मीदेवी चा सभामंडपाची मागणी राजे यांनी केली व इतर कामाची मागणी केली होती ते काम सध्या प्रगतीपथावर ती आहे. 2016 पासून हजारो युवकांचे वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली यातून अनेक मित्र परिवार जोडण्याचे कार्य  अमोल राजे यांनी केले त्यामुळे इंदापूर तालुका व परिसर यामध्ये आपला नेता अमोल राजे इंगळे या नात्याने प्रसिद्धी मध्ये आले .ते लग्न समारंभ व दुःखाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवतात त्यामुळे लोकांना आपला नेता या नात्याने त्यांना आपलंसं करतात आपला माणूस आपल्यासाठी हे नातं समाजातील लोकांमध्ये रुजवण्याचे खरे कार्य त्यांनी केल्याचे दिसत आहे.

तसेच बीडसिंग बाभूळगाव रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला असता सदर रस्त्याचे काम काही दिवसांनी पूर्ण करण्यात आले. याच काळात 6 एकर केळी मधून 4 लाख खर्चातून चाळीस लाखाचे केळी दुबईला देऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त झाली होती अमोल राजे यांना पहिले सामाजिक पद पोलीस फ्रेंडस वेलफेर असोसिएशन यांच्यावतीने इंदापूर तालुका अध्यक्ष पदी निवड करून सामाजिक कार्य करण्याची संधी देण्यात आली तसेच मराठा सेवा संघ या संघटनेच्या पुणे जिल्हा कार्य अध्यक्षपदी निवड 30 जानेवारी 2018 रोजी करून समाजामध्ये नवक्रांती निर्माण करण्याचे कार्य याद्वारे अमोल राजे यांनी केले या संघटनेच्या कार्य पदावर विराजमान झाल्यापासून त्यांनी युवकांना व्यसन मुक्त होण्याचे आव्हान व प्रबोधन जास्त प्रमाणात केले. पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे इंदापूर तालुकातील निवडी यावेळेस करून तालुक्यामध्ये विशेष संघटन केले. दिनांक 14 एप्रिल 2018 रोजी बाभूळगाव येथे आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवून जयंती साजरी केली .27 मे 2018 रोजी कुमारी स्नेहा अमोल इंगळे या मुलीच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे हाफ स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करून युवकांना आपले कौशल्य विकसित करण्याचे व्यासपीठ तयार करून मोठ्या प्रमाणात बक्षीस वितरण केले .25/ 8/ 2018 रोजी मराठी क्रांती ठोक मोर्चा मध्ये बेमुदत ठिय्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वीरित्या हाताळले. 3 मे 2018 रोजी इंदापूर येथे बालाजी पथ् कांबळे गल्ली येथे शिवराज ज्वेलर्स या नावाने नवीन शॉप चालू करून त्याचे उद्घाटन मान्य श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या हस्ते केले. 11 ऑगस्ट 2018 रोजी तुळजापूर ज्योत घेऊन येणारे भाविकांसाठी बाभूळगाव फाटा पुणे हायवे येथे केळी खिचडी चिवडा फळे वाटप व फिल्टरच्या पाण्याचे वाटप शेकडो भाविकांसाठी करण्यात आले .होते 27/ 7/ 2019 रोजी स्नेहा अमोल इंगळे या मुलीच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना याची शिबिर आयोजित केले तसेच ज्येष्ठ नागरिकांना सवलतीत प्रवास योजना अडीचशे लोकांना लाभ मिळवून दिला .ओंकार नाथ देवस्थान रांजणी येथे सलग 26 मार्च2009 पासून प्रत्येक वर्षी एक दिवसाचे अन्नदान करण्याचे कार्य अमोल राजे परिवारा तर्फे करण्यात येते 6 मार्च 2019 रोजी न्यू ऑल इंडिया काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी अमोल राजे इंगळे यांची निवड माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब आमदार प्रणिती ताई शिंदे अंकिता ताई पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र काँग्रेस कार्यकर्ता शिबिर यामध्ये देण्यात आले बाभूळगाव येथे जिजाऊ जयंती साजरी केली त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून ग्रामस्थांनी स्वच्छता केली  6जानेवारी 2019 रोजी इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त ट्रॉफी व सत्कार देऊन सन्मान करण्यात आला .29 ऑगस्ट 2018 रोजी इंदापूर पोलीस स्टेशन येथे पोलिसांना राख्या बांधून सण साजरा केला .अमोल राजे इंगळे यांच्या वतीने इंदापूर पोलिस स्टेशन येथील सर्व पोलीस मित्रांना जवळ-जवळ बरेचसे सण साजरे करतात. पोलीस मित्रांना सणा निमित्त बंदोबस्त असल्याने त्यांना घरी जाऊन सण साजरा करता येत नाही  म्हणून एक सामाजिक बांधिलकी या नात्याने राजे वेगवेगळे सण साजरे करतात
दिनांक 4/12/ 2017 रोजी अमोल इंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त माऊली अनाथ बालक आश्रम येथे शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम करून वाढदिवस साजरा केला तसेच दिनांक 14 12 2018 रोजी बाभूळगाव येथे इंदापूर माढा करमाळा माळशिरस पुणे बारामती येथील अनेक कार्यकर्त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला .यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्यासाठी अप्रतिम असे जेवणाचे नियोजन केले होते . या दिवशी वाढदिवसा निमित्त 15 टन हिरवा चारा जनावरांसाठी मोफत वाटप केले . दिनांक 14/ 12 /2019 बाभूळगाव मध्ये अमोल इंगळे यांनी  आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते त्यामध्ये कान नाक घसा डोळे तपासणी केले. हाडांचे डॉक्टर यांच्या द्वारे हाडांचे रुग्ण त्याचीही तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन महेंद्र दादा रेडके ,अमर जगदाळे व गावातील इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इंदापूर येथे उपजिल्हा रुग्णालय  सर्व रुग्णांना सफरचंद केळी इत्यादी फळे वाटप करून रुग्णांना लवकर बरे व्हावेत या साठी शुभेच्छात्यांनी दिल्या. तसेच माऊली बालक आश्रम मध्ये निराधार मुलांना बॅटबॉल बुद्धिबळ शालेय साहित्य खाऊ व फळे वाटप केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाभूळगाव येथे शिवराज ज्वेलर्स या नावाने तीनशे वह्या व फळे खाऊ वाटप केले . वडापुरी येथे पालखी आल्या दिवशी चहा वाटप स्वच्छता अभियान व भाविकांच्या पायाची मालिश करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. 26/ 11 /2019 रोजी चांडाळ चौकडी च्या करामती नवीन वेबसाईटच्या शुभारंभ श्री अमोल राजे इंगळे यांच्या हस्ते बारामती येथील कांबळेश्वर गावी करण्यात आले .2019 च्या  माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या गाव भेटीच्या सभेमध्ये बाबुळगाव येथे अमोल इंगळे यांनी भीमा नदी मध्ये जनावरांच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा या उद्देशाने जर लोकवर्गणीतून बुडीत बंधारा करण्याचे ठरवले तर स्वतः एक लाख रुपये वर्गणी देण्याचे भाषणात सर्वसाक्षी वर्गणी देण्याचे मान्य केले .कोरोनाविषाणू या जागतिक महामारी च्या संकट काळात पुणे सोलापूर हायवे हे सोलापुर चेक नाका येथील पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचारी तसेच वाटसरूंना भरपेट नाश्ता चहा व फिल्टर चे पाणी उपलब्ध करून दिले . तसेच इंदापूर एसटी स्टँड येथे अचानक लोक डाऊन मध्ये अडकलेल्या प्रवाशांना मोफत नाष्टा पाणी दिले व त्यांची आपुलकीने विचारपूस केलीअमोल राजे इंगळे यांनी शिवप्रहार महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्षपदी कार्य केले तसेच राहुल गांधी युवा शक्ती संघटन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणूनही काम केले आहे . वरील सर्व कार्याचा विचार करताय अमोल राजे हे सामाजिक राजकीय संघटनात्मक आरोग्य क्रीडा शिक्षण धार्मिक सण-उत्सव, उद्योग व्यवसाय इतरांच्या सुख-दुःखात आपला माणूस म्हणून सहभागी होणे हे सध्याच्या परिस्थितीत घरात कोणताही सामाजिक व राजकीय सहभाग आस्था नाही आपला माझी कार्यातून व राजकीय कार्यातून आपली वेगळीच ओळख निर्माण करण्याचे वास्तविक कार्य अमोल राजे व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य यांनी समाज हितासाठी जडणघडणीसाठी जो आपला विशेष सहभाग नोंदवला तो महाराष्ट्रातील जनतेला अतिशय प्रेरणादायी व उत्साह वर्धक राहील अमोल राजे इंगळे यांची ओळख आता सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून राहिली आहे अमोल राजे हे हर्षवर्धन पाटील साहेब यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात तसेच काठी वडापुरी गटामध्ये त्यांनी विशेष कार्यातून आपली ओळख निर्माण केलेली दिसून येत आहे ते आजही आपल्या कार्य कर्त्याच्या व मित्रांच्या अडीअडचणीला धावून येत असल्याचे निदर्शनास येत आहेत खरंच त्यांच्या या कार्याला सर्व स्तरातून कौतुकाची थाप देण्याचे कार्य आपल्या समोर दिसत आहे समाज कार्य काळातत 19 व 20 फेब्रुवारी 2020 रोजी बाबुळगाव थे शिवजयंती मोठ्या केला यावेळी माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब अप्पासाहेब जगदाळे अंकिता ताई पाटील राजवर्धन दादा पाटील हिंदवी स्वराज्य स्वराज्य फाऊंडेशनचे सभासद व गावातील मान्यवर लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला दिनांक 27 7 2020 रोजी कुमारी स्नेहा अमोल इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त बाबुळगाव येथे तीनशे वृक्ष माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते लावून वाढदिवस साजरा करण्यात आला हा वाढदिवस समाजापुढे एक अनोखा आदर्श निर्माण करणारा ठरला .खरंच अमोल राजे इंगळे यांचे कार्य म्हणजे सामाजिक बांधिलकी निस्वार्थ व्यक्तिमत्वाचे आहे त्यांच्या या कार्याचे जनतेतून विशेष कौतुक होत आहेत अमोल राजे इंगळे हे आजही समाजातील प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात स्वतःहून जातात यातून अमोल राजे नेता जनसामान्यांचा या शब्दाचा मान राखत काम करीत आहेत त्यांच्या या कार्याची सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक अध्यात्मिक क्रीडा सर्व क्षेत्रात दखल घेतल्याचे दिसत आहे त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा
close