shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अंकिता ताई पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट..!!

दि 17/08/2020 रोजी आज राजभवन, पुणे येथे महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी जी यांना माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब त्यांच्या समवेतजिल्हा परिषद सदस्य कु.अंकिता ताई हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेतली.

सदर भेट झाल्यानंतर अंकिता ताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आपले राज्यपाल सदैव जनसेवेसाठी तत्पर, प्रशासनाचा व राजकारणाचा प्रदिर्घ अनुभव असणारे आहेत. 


या वयात देखील एक वेगळी ऊर्जा त्यांच्या बोलण्यातून व संकल्पनेतून जाणवत होती. तरुणांनी विशेषता युवतींनी राजकारणात सक्रिय होऊन जनसेवा व समाजसेवा करावी यासाठी ते आग्रही आहेत. माननीय भगतसिंह कोश्यारी जी यांच्या या भेटीमुळे पुढील कार्य करण्यास मला एक नवीन ऊर्जा व प्रोत्साहन मिळाले आहे. माननीय राज्यपाल यांना भेटण्याचा बहुमान माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्यामुळे मिळाला असे त्यांनी आपले मत व्यक्त केले
close