राजगुरुनगर । प्रतिनिधी विद्याधर साळवे,
दि.१८खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शिवे गावामध्ये वळणवाट फाउंडेशनच्या वतीने आदिवासी वस्तीवर गरजू लोकांना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर , सरपंच सौ.आशाताई साकोरे , रामगिर बाबा ढोल मंडळ अध्यक्ष तुकाराम शिवेकर, पैलवान जयराम खेंगले , नवनाथ शिवेकर, सत्यवान खेंगले, अक्षय शिवेकर, आनंद साकोरे, अनिल वाघमारे, राजेंद्र गडदे, साक्षील शिवेकर, वळण वाट टीम तर्फे समीर पाटील, अमित बोंबले, रामदास देवकर, आदेश डोके, अश्विनी मोरे व अमजद खान हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कातकरी वस्तीवरील सुमारे 35 कुटुंबांतील लोकांना व महिलांसाठी आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. या आरोग्य किटमध्ये महिलांसाठी सॅनिटरी पॅड , डेटॉल साबण , कोलगेट टूथपेस्ट , ब्रश , मेडिक्लोर सोलुशन इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी रामदास देवकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मयूर मोरे यांनी केले तर आभार अक्षय शिवेकर यांनी मानले.
---------------------------------------------------------

