केज | तालुका प्रतिनिधी (प्रकाश मुंडे):-
पोळा हा शेतकऱ्यांसाठी अति महत्वाचा सण असुन शेतकरी अति उत्साहाने व आनंदाने हा सण साजरा करीत असतात .मात्र बळीराजासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पोळा या सणा वरती कोरोनाचे सावट आल्याने बळीराजाच्या अतिमहत्त्वाच्या पोळा या सणावर विरजण पडले आहे .
कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी आप-आपल्या घरीच पोळा सण साजरा करावा या मा.जिल्हाधिकाऱी व मा. तहसिलदार साहेब यांच्या आवाहनास प्रतिसाद देत यंदा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाचे घरीच पुरण पोळी चारुन पूजन करून पोळा साजरा केला आहे.
बळीराजाच्या शेतात वर्षभर राब- राबणाऱ्या सर्जा राजांना सजवुन शिंगांणा रंगरंगोटी करून रंगीबेरंगी फुगे लाऊन त्यांचे पूजन करून पुरणपोळी खाऊ घालण्याचे महत्व पोळा या सणाला आहे.
पोळा हा शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाचा सण असून शेतकरी अति उत्साह व आनंदाने हा सण साजरा करीत असतात, ढोल ताशे लावून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली जाते. परंतु मागील काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागातही कोरोणाचे रुग्ण आढळून येत असल्याने कोरोणाचे सावट गडद होत चालले आहे त्याचा परिणाम बैल पोळा या सणा वर ही झाला आहे. मा. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी सार्वजनिक पोळा,सण साजरा करण्यास प्रतिबंध घातले आहेत त्यांच्या आदेशाचे पालन करीत कोरोणाच्या सावटाखाली पोळा सण साजरा करण्यात आला.
बळीराजाने आप-आपल्या घरीच सर्जा राजाला पुरणपोळी खाऊ घालून पुजन करुन पोळा सण साजरा केला, केज तालूक्यात पारंपारिक पद्धतीने पोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे.
गावातील वेशीमध्ये तोरण बांधुन तोरण तोडण्याची परंपरा आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा यावर्षी खंडित झाली आहे. बळीराजाने आप-आपल्या घरीच सर्जा राजाची पूजा करून नैवेद्य देऊन बैलपोळा सण साजरा करण्यात आला आहे, दरवर्षी ढोल-ताशा लावून वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढली जाते . मोठ्या उत्साहाने आनंदाने सार्वजनिक पोळा सण साजरा केला जातो.
तालुक्यातील कोरोना चा कहर लक्षात घेता या वर्षी इतर सणाप्रमाणे पोळासुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या घरीच साजरा केला असून मा. जिल्हाधिकारी व तहसिलदार यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत शेतकऱ्यांनी आप-आपल्या घरीच सर्जा राजाची पूजा करून हा सण साजरा केला.
----------------------------------------------
कोरोनाने शहरी भागासह ग्रामीण भागातही थैमान घातले असून आता ग्रामीण भागातही कोरोणाचे रुग्ण आढळून येत आहेत मा. जिल्हाधिकारी व तहसिलदार साहेब यांनी सार्वजनिक पोळा,ऊत्सव साजरा करण्यास प्रतिबंध घातले आहेत त्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करीत गावातील सर्व शेतकरी बांधवांनी सर्जा राजाला मिरवणूकीसाठी बाहेर घेऊन न जाता आप-आपल्या घरीच पुरणपोळी चा नैवेद्य दाखवून पूजन केले आहे.

