रस्ता बनवतायत की खड्डे, कशाला कश्याचा मेळ लागेना ....!!
केज तालुका प्रतिनिधी । प्रकाश मुंडे:-
अंबेजोगाई-मांजरसूंबा महामार्गाचे केज शहर अंतर्गत काम सद्या सुरू आहे. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ अंतर्गत एच पी एम कंपनी द्वारा हे काम सुरू असून केज शहर अंतर्गत हे काम उत्कृष्ट दर्जाचे आणि सुनियोजित पद्धतीने वेळेत पूर्ण करावे.
सदरील काम हे निष्क्रष्ट दर्जाचे व सुमार होते आहे. तसेच लांबचे लांब रस्ता खोदून ठेवला आहे व कोणतेही फलक न लावता कामे अर्धवट सोडून दिलेली आहेत या बद्दल कालच शिर्डी एक्सप्रेस ने आवाज उठवला होता हे विषेश. "
या कामात निकृष्ठ दर्जा दिसून आल्यास केज विकास संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा समीतीचे समन्वयक हनुमंत भोसले , नासेर मुंडे यांनी एका निवेदनाद्वारे एच पी एम कंपनीला दिला आहे.
सध्या केज शहर अंतर्गत अंबेजोगाई-मांजरसुम्बा या महामार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी धारूर केज रस्त्याचे काम पाहिजे तसे झालेले नाही. त्या रस्त्यावर वर्षाच्या आत अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. हे रस्ते केजसाठी पुढील अनेक वर्षे खूप महत्वाचे आहेत यासाठी आताच त्यावर केजवासीयांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
अंबेजोगाई-मांजरसुम्बा हा होणारा रस्ता देखील केज शहरातील नागरिक व पुढील कांही दशकातील पिढ्याना वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. शहराबाहेर झालेल्या कामाबद्दल कांही तक्रारी असल्याने किमान केज शहर अंतर्गत भागात होणारा रस्ता चांगल्या दर्जा व गुणवत्तेचा होणे गरजेचे आहे. कंपनीच्या नियोजनाअभावी नागरिकांना मोठा त्रास होतो आहे.
आवश्यक तेथे वेळेवर पाणी मारण्याचे काम होत नाही. आवश्यक त्या प्रमाणात खोदकाम करून रस्त्याचे लाईफ अधिक राहण्यासाठी सर्व नियमांचे व इस्टिमेट नुसार काम पाडले जावे व आवश्यक तेथे दर्शनी भागात तसे इस्टिमेटचे फलक लावावेत तसेच केज शहरांतर्गत भागात या रस्त्याची रुंदी सहा पदरी करावी अशी मागणी समितीने निवेदनाद्वारे संबंधित रस्ता निर्माण यंत्रणेकडे केली आहे. कामाचा दर्जा निकृष्ट राहिल्यास त्याच वेळी कोणतीही पूर्वसूचना न देता काम थांबण्याचा इशाराही समितीने दिला आहे. केज शहरातील लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव व शहरातील नागरिकांनीही या बाबतीत विशेष लक्ष घालून हा रस्ता उत्कृष्ठ दर्जाचा होईल यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

