shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव तालुक्यातील घोरदरी येथील जनावरावर लम्पी स्किन डिसेसचा प्रादुर्भाव..!!



  • गडचिरोली बिड जिल्ह्यानंतर सेनगाव  तालुक्यात पसरतोय हा रोग..
  • सेनगाव तालुक्यातील   घोरदरी येथे आढळले बाधीत जनावरे पशुपालकात भिती..

हिंगोली  प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२९,कोरोना महामारीने त्रस्त असलेल्या हिंगोली जिल्ह्यात आता माणसापाठोपाठ आता एका व्हायरसने सेनगाव  तालुक्यातील जनावराव हल्ला चढवला असुन गडचिरोली,बीड नंतर थेट हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव  तालुक्यातील घोरदरी येथे येऊन ठेपल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे सेनगाव परिसरातील घोरदरी  गावातील जनावराना लम्पी स्किन डिसेस या रोगाची लागन होताना दिसुन येत असुन हा रोग जनावरामध्ये ढास आणी गोचीडा मार्फत पसरला जातो हा पसरायला लागला की आटोक्यात आणने अवघड आहे सेनगाव तालुक्यात घोरदरी  आत्ता या रोगाची सुरवात जाली आहें त्यामुळे या रोगाला वेळीच आटोक्यात आणने गरजेचे बनले आहे .




👆साखरा येथील पशुवैद्यकीय दवाखाना

लम्पी स्किन डिसेस हा जनावरातील दिसुन येणारा चर्मरोग आहे यांचे जंतु देवी विषाणु गटातील कँपे पाँक्स गटात मोडतात या विषाणुमुळे शेळी,मेढ्यातील देवी रोगाच्या विषाणुशी समानता आढळुन येते मात्र हा रोग शेळी मेढ्यात अजिबात होत नाही रोगाचा प्रादुर्भाव गोवंशात ३० टक्के , म्हशीमध्ये काही प्रमाणात होताना दिसुन येतो देशी गोवंशापेक्षा संकरीत जनावरात तो अधिकतेने प्रसारीत होतो हा रोग झाल्यानंतर जनावरे अशक्त होतात ,दुध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते जनावराचा गर्भपात होतो प्रजनन क्षमता घटते  तसेच या रोगामुळे त्वचा खराब होते जनावर विकरीक दिसतात हा लम्पी स्किन डिसेस रोग आता सेनगाव तालुक्यात येऊन ठेपला आहे महाराष्ट्रातील गडचिरोली,बीड नंतर तो थेट सेनगाव तालुक्यात दिसुन आला आहे या रोगाने घोरदरी  येथे दोन बैल  बाधीत केले आहेत त्यामुळे पशुपालकांत आता भितीचे वातावरण पसरले आहे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने या गंभीर बाबीकडे अध्याप लक्ष दिले नसल्याचे दिसुन येत आहे. हा रोग ढास आणी गोडीचा मार्फत मोठ्या प्रमाणात पसरण्याची भिती आसल्यामुळे जनतेत भर कोरोनात भिती निर्माण झाली आहे हा रोग माणसाला होऊ शकतो का ..?  यांची दहशत जनतेत आहे याची गंभीर दखल आता जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाने घेऊन सरसकट लसिकरण मोहीम हाती घेण्याची मागणी पशु पालकांनी केली आहे


(पशु वैद्यकीय अधिकारी श्री जावळे यांच्याशी शरद नागुलकर यांनी संपर्क साधला असता "ते ज्या गुरांना लम्पी डिसेसचा प्रादुर्भाव झाला आहे त्याना बाजूला ठेवा आणि मी सोमवारी तुमच्या गावात येईन नंतर बघु"असे ऊत्तर उत्तम जावळे यांनी फ़ोन द्वारे शरद नागुलकर यांना देण्यात आले आहे.सध्या नागुलकर हे खाजगी डॉक्टर कडून उपचार करुन घेत आहेत.)

प्रतिक्रिया 
साखरा येथे पशु वैद्यकीय दवाखाना असुन येथे एक पशुवैद्यकीय अधिकारी व एक परिचर आहे हे दोघेही कर्मचारी बाहेर गावावरुन अपडाऊन करत आहेत पशुपालकांनी जनावरांना दाखवायचे असेल तर या अधिका-याची तास् न तास वाट पहावी लागते तसेच कधी या अधिका-याचे फोन बंद येत आसल्याने खाजगी डाँक्टर मार्फत उपचार करण्याची वेळ या परिसरातील पशुपालकांवर आली आहे त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी व सहकारी कर्मचारी यांनी साखरा  येथे कधीच वेळेवर हजर राहत नाहीत माझ्या दोन बैलाला लम्पी स्किन डिसेस रोगाची लागन झाली आहे हा रोग संसर्गजन्य आहें त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे  माझ्या बैलाची तब्येत खुप गंभीर असून देखिल अद्याप देखिल कोणतेही पशु वैद्यकीय अधिकारी माझ्या बैलाला पहायला आले नाहीत यामुळे मला खाजगी डॉक्टर कडून उपचार करावे लागले आहेत 

पांडुरंग नागुलकर रा.घोरदरी ता.सेनगाव.जि.हिंगोली
close