shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तरुणांनी अण्णाभाऊ साठे यांचे आदर्श कार्य डोळ्यासमोर ठेवावे: विक्रांत दादा शिंदे..!!

जोमेगाव। प्रतिनिधी  :
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त जोमेगाव येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला युवा नेते विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी युवा नेते विक्रांत दादा शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना युवा नेते विक्रांत दादा शिंदे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य महान असून प्रत्येक गावातील युवकांनी अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा व आदर्श आचरण करण्याचा प्रयत्न करावा ,अण्णाभाऊ साठे हे थोर विचारवंत होते त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठे योगदान दिलेले असून आजच्या युवकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. असे आवाहन युवा नेते विक्रांत दादा शिंदे यांनी बोलताना केले.

पुढे बोलताना म्हणाले की,लवकरच जोमेगाव मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व सभामंडप यासाठी मी प्रयत्नशील राहीन, त्याप्रसंगी भास्करराव पा. जोमेगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर पा. शिंदे,कोंडजी पा. शिंदे,पोलीस पाटील मारोती पांचाळ,चेअरमन दिगंबर पा. शिंदे,तलाठी आस्कुलवार, ग्रामसेवक श्रीरामवार,विठ्ठल ढेपे,युवा सरपंच आदिनाथ पा. शिंदे,सचिन पा. कुदळकर,अनिकेत पा. जोमेगावकर,जयंती मंडळाचे अध्यक्ष जयवंता गव्हाणे,माजी सरपंच पुरभाजी शेटे,माजी सरपंच कोंडबा गव्हाणे,प्रभाकर गव्हाणे,साहेबराव गव्हाणे,वैभव भुरे,भैय्यासाहेब वाघमारे,भरत गव्हाणे, मोहन गव्हाणे,राहुल गव्हाणे,संतोष गव्हाणे,मनोहर भुरे तसेच बचत गटाच्या CRP सौ.प्रज्ञाताई भुरे,कलावतीबाई गव्हाणे,बेबीताई गव्हाणे सह जयंती मंडळाचे सर्व सदस्य तसेच गावकरी सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते.
close