*गडचिरोली बिड जिल्ह्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पसरतोय हा रोग..
*गिरगांव परिसरातील परजना येथे आढळले बाधीत जनावरे पशुपालकात भिती..
हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२६,कोरोना महामारीने त्रस्त आसलेल्या हिगोली जिल्ह्यात माणसापाठोपाठ आता एका व्हायरसने वसमत तालुक्यातील जनावराव हल्ला चढवला असुन गडचिरोली,बीड नंतर थेट हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात येऊन ठेपल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे .गिरगांव परिसरातील परजना या वसमत तालुक्यातील गावातील जनावराना लम्पी स्किन डिसेस या रोगाची लागन होताना दिसुन येत असुन हा रोग जनावरामध्ये ढास आणी गोचीडा मार्फत पसरला जातो हा पसरायला लागला की आटोक्यात आणने अवघड आहे वसमत तालुक्यात आँगस्ट मध्ये पांगरा बोखारे येथेही या रोगाने थैमान घातले आहे आता तो गिरगांवसह परिसरातील परजना येथे उच्छाद मांडु पहात आहे त्यामुळे या रोगाला वेळीच आटोक्यात आणने गरजेचे बनले आहे .
लम्पी स्किन डिसेस हा जनावरातील दिसुन येणारा चर्मरोग आहे यांचे जंतु देवी विषाणु गटातील कँपे पाँक्स गटात मोडतात या विषाणुमुळे शेळी,मेढ्यातील देवी रोगाच्या विषाणुशी समानता आढळुन येते मात्र हा रोग शेळी मेढ्यात अजिबात होत नाही रोगाचा प्रादुर्भाव गोवंशात ३० टक्के , म्हशीमध्ये काही प्रमाणात होताना दिसुन येतो देशी गोवंशापेक्षा संकरीत जनावरात तो अधिकतेने प्रसारीत होतो हा रोग झाल्यानंतर जनावरे अशक्त होतात ,दुध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते जनावराचा गर्भपात होतो प्रजनन क्षमता घटते तसेच या रोगामुळे त्वचा खराब होते जनावर विकरीक दिसतात हा लम्पी स्किन डिसेस रोग आता वसमत तालुक्यात येऊन ठेपला आहे महाराष्ट्रातील गडचिरोली,बीड नंतर तो थेट वसमत तालुक्यात दिसुन आला आहे या रोगाने परजना येथे अनेक जनावरे बाधीत केले आहेत त्यामुळे पशुपालकांत आता भितीचे वातावरण पसरले आहे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने या गंभीर बाबीकडे अध्याप लक्ष दिले नसल्याचे दिसुन येते हा रोग ढास आणी गोडीचा मार्फत मोठ्या प्रमाणात पसरण्याची भिती आसल्यामुळे जनतेत भर कोरोनात भिती निर्माण झाली आहे हा रोग माणसाला होऊ शकतो का ..? यांची दहशत जनतेत आहे याची गंभीर दखल आता जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाने घेऊन सरसकट लसिकरण मोहीम हाती घेण्याची मागणी पशु पालकांनी केली आहे
प्रतिक्रिया
गिरगांव येथे पशु वैधकीय दवाखाना असुन येथे एक पशुवैधकीय अधिकारी व एक परिचर आहे हे दोन्हीनी कर्मचारी बाहेर गावावरुन अपडाऊन करत आहेत पशुपालकांनी जनावराना दाखवायचे असेल तर या अधिका-याची तास् न तास वाट पहावी लागते तसेच कधी या अधिका-याचे फोन बंद येत आसल्याने खाजगी डाँक्टर मार्फत उपचार करण्याची वेळ या परिसरातील पशुपालकांवर आली आहे त्यामुळे पशुवैधकीय अधिकारी व सहकारी कर्मचारी यांनी गिरगांव येथेच मुख्यालयी रहावे अशी मागणी या निमीत्ताने शेतकरी वर्गातुन होत आहे

