शिर्डी प्रतिनिधी :
कु.किरण जाधव
राज्यात ; कोरोना महामारीचे प्रचंड मोठे संकट ओढावलेले असताने या महामारीत , नर्सिंग स्टाफ आज समाजासाठी देवदूताची भुमिका बजावत आहेत . मात्र ; शिर्डी येथील श्री. साईनाथ रुग्णालयात कर्तव्य बजावत असणाऱ्या आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांच्या वेतनात गेल्या तीन महिन्यांपासून सूमारे चाळीस टक्के कपात केली आहे . या विरोधात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री श्नी .बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष अहमनगर उत्त्तरचे जिल्हाध्यक्ष् श्री. अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुक्याच्या वतीने , शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान प्रभारी मुख्य कार्य कारी अधिकारी श्री. घोरपडे यांना निवेंदन देण्यात आले आहे.
संस्थानचे सर्व आऊट सोर्स कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची झालेली वेतन कपात रद्द करण्यात यावी , तसेच आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कोरोना योद्धाना विमा कवच प्रदान करण्यात यावे अशी मागणी निवेदनात मांडण्यात आली आहे. निवेदनातील प्रत्येक मागणीवर बारकाईन विचार करून सर्व मागण्या निकली काढाव्यात अन्यथा राज्यमंत्री श्री.बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार स्टाइलने पुढील कार्यवाही करण्यात येईल असा इशारा प्रहार राहाता तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष श्री दिनेशराजे शेळके यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी श्री. साईबाबा संस्थांनच्या आरोग्य विभागातील शेकडो कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तातडीने कर्मचाऱ्यांची मागणी समितीपुढे मांडून , सकारात्मक व ठोस निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन साई संस्थान चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .घोरपडे यांनी दिले आहे. यानंतर शिर्डी चे कर्तव्यदक् अधिकारी श्री शिंदे साहेब यांच्या दालनात राहाता तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली , प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून श्री .भाउपाटील जाधव यांच्या प्रशासकीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. राहाता तालुक्यातील वाकडी गावातून जाणारा शिर्डी - शनि-शिंगणापूर रस्त्यावर पडलेल्या अगणित खड्यांच्या त्रासाने कंटाळून वाकडी ग्रामपंचायतने सदर रस्तादुरुस्ती साठी चक्क ग्रामपंचायत ठराव चं प्रहार कडे सुपूर्द केला , तद्नंतर जिल्हाद्यक्ष श्री. पोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे चांगलीच कानउघाडणी करून सदर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले.
या कामी प्रहार जनशक्ती पक्षांचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिजित पोटे , संघटक श्री. अभिजित कालेकर , सरचिटणीस श्री. अभिजीत पाचोरे ,प्रहार जनशक्ती पक्षाचे राहाता तालुकाध्यक्ष श्री.दिनेशराजे शेळके पाटील , दिव्यांग क्रांतीचे उपाध्यक्ष श्री. नितिन भन्साली , तालुक्याची बुलंद तोफ श्री. विजय काकडे , वाकडी गावचे सरपंच ,श्री लांडे, श्री गंगाधर गमे , शेतकरी नेते श्री. रूपातात्या काले , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विठ्ठलराव शेळके , रणजीत अाहेर, दिपक घोघरे,सचिन आरने सूधाकर डांगे , विजय साळवे ,आरोग्य सेवक श्री ब्राम्हणे आदी. उपस्थित होते .

