🌹 एक वर्ष असे ही🌹
ना सुगंध लोणच्याचा
ना कप आईस्क्रीमचा
ना रस उसाचा
एक वर्ष असे ही...
ना लग्नाचे आमंत्रण,
ना हळदीचे जेवण ,
ना मातीचे आवताण
ना दहाव्याचे बोलावणं
एक वर्ष असे ही...
ना अपेक्षा साडीची
ना मागणी मेकअपची
ना खरेदी बुटांची
ना घडवणी दागिन्यांची
एक वर्ष असे ही...
नाही तिकिट रेल्वेचे
नाही आरक्षण बसचे,
नाही बुकिंग फ्लाइटचे
रिक्त होते रुम हॉटेलचे
एक वर्ष असे ही ..
ना वडिलांचे अंगण,
ना आईच्या हातचे वरण
ना मामाकडचे पुरण
ना काका कडचे जेवण
एक वर्ष असे ही ..
ना मंदिराची घंटा,
ना दर्शन साठी तंटा
ना दानधर्म भक्तांचा
ना प्रसाद देवाचा
एक वर्ष असे ही ..
नेहमीच राहील या वर्षाची आठवण
पुनः कधीच येऊ नये असे साल यानंतर..!!
"शिर्डी एक्सप्रेस सेवा"
@@@@@@@@@@@@@@@@@

