केज । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे ) :-
रोटरी क्लब केजचे विद्यमान अध्यक्ष, माऊली विद्यापिठाचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य लक्ष्मणराव डोईफोडे सरांचे काल दिनांक ७ रोज शुक्रवारी रात्री दु:खद निधन झाले.
केज शहर व परिसरात प्राचार्य लक्ष्मणराव डोईफोडे सरांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. डोईफोडे सरांचे केजच्या शैक्षणिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. त्यांच्याकडे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी क्लास वन, क्लास टू अधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. तर इतर अनेक विद्यार्थी सामाजिक, राजकीय व औद्योगिक क्षेत्रात नाव मोठे करून समाजात एक आदर्श निर्माण करत आहेत.

प्राचार्य लक्ष्मणराव डोईफोडे सरांचे केजच्या शैक्षणिक क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात फार मोठे कार्य व नाव होते. सतत हसतमुख चेहरा, एक संयमी व मनमिळाऊ व्यक्ती म्हणून ते परिचित होते. केज येथील प्राचार्य लक्ष्मणराव डोईफोडे सर यांचा सरस्वती कन्या प्रशाला व रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या पायाभरणीत सिंहाचा वाटा आहे. केज शहरासह कासारी या त्यांच्या मूळ गावी त्यांचा राजकारणात मोठा दबदबा होता. मा. अशोक पाटील व मा. रजनीताई पाटील यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून प्राचार्य लक्ष्मणराव डोईफोडे सरांचा नावलौकिक होते.
त्यांच्या या अशा अचानक निघून जाण्याने डोईफोडे परिवारासह संपूर्ण केज परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. त्यांच्या पाठीमागे मोठा परिवार असून अमोल डोईफोडे हे त्यांचे चिरंजीव राजकारणात व समाजकारणात मोठे नाव कमवून आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो व परिवाराला दु:खातुन सावरण्याची शक्ती देवो.प्राचार्य लक्ष्मणराव डोईफोडे सरांच्या पाठीमागे वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले , एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.