shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लातूर शहरावासीयांना कोरोना संबंधित अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणार..!!

bedinfo.mclatur.org डॅशबोर्ड कार्यान्वित...

लातूर । (रवि बिजलवाड)

जुलै ०७ / लातूर शहर :
लातूरचे पालकमंत्री मा ना श्री अमितजी विलासरावजी देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहरवासीयांना "शहरात एकूण कोरोना रुग्णसंख्या किती आहे? ॲक्टीव्ह कोरोना रुग्णसंख्या किती आहे? कोरोनावर कोठे कोठे उपचार सुरू आहेत? कुठे बेड्स उपलब्ध आहेत? रूग्णालयांचा पत्ता, रूग्णालयाचा संपर्क क्रमांक" अशी कोरोनाशी निगडित अत्यावश्यक माहिती एका क्लिकवर मिळावी या हेतूने bedinfo.mclatur.org या डॅशबोर्ड ची निर्मिती करण्यात आली आहे. आज लातूर महानगरपालिकेचा डॅशबोर्डचे कार्यान्वित करण्यात आला.
या डॅशबोर्डमुळे शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांची व त्यांच्या कुटुंबियांची होणारी धावपळ थांबेल व बेड्स शिल्लक नसल्याच्या व तत्सम अफवांना आळा बसेल असा विश्वास आहे. यावेळी सोबत उपमहापौर श्री ‌चंद्रकांतजी बिराजदार, स्थायी समितीचे सभापती श्री दीपकजी मठपती ,नगरसेवक श्री सुनीलजी मलवाड व अधिकारी उपस्थित होते.

हा डॅशबोर्ड विकसित करणारे आपल्या लातूरचेच रहिवासी श्री शिवकुमारजी महाजन यांचे यानिमित्ताने आभार...!!
close