shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यात अवैद्य वाळू माफियांनी मुजोरी वाढली..!!

वाळू उपशाची बातमी का दिली म्हणून वाळू माफियांच्या अनोळखी हस्तकांनी तक्रारदाराच्या कानाला पिस्तुल लावले : एका वकीलासह सहजणांवर गुन्हा दाखल   ......!!! 

केज  प्रतिनिधी  ( प्रकाश मुंडे)  केज तालुक्यात वाळू माफियांची मुजोरी वाढली असून एका तरुणाने या संबंधी उपोषणाचा ईशारा दिला होता. त्या संदर्भात विविध वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होताच वाळूमाफियांच्या ईशाऱ्या वरुन समाजसेवकावर पिस्तुल रोखुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी केज येथील एका नामांकित वकीलासह सहाजणांचवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकारामुळे केज तालुक्यात लॉकडाउन असतानाही खळबळ माजली आहे.

या बाबतची प्राप्त माहिती अशी की, केज तालुक्यातील बेलगाव येथील समाजसेवक प्रताप नरसिंग दातार वय २९ वर्षे असुन त्याचे पुणे येथे सेंट्रींग मटेरियल विकण्याचे दुकान आहे. तो लाकडाऊन चालु असल्यामुळे बेलगाव येथे गावी आला होता. त्याचे घर हे बेलगाव येथुन जाणाऱ्या बोभाटी नदीच्या जवळ आहे. 


मागील काही दिवसापासुन आरणगाव आणि बेलगावच्या नदीवर दिवस-रात्र लक्ष्मण भोसले वकील रा. वरपगाव, तुळशीराम घुले रा. बेलगाव  व राजेभाऊ ईतापे रा.अरणगाव हे एकत्र मिळुन व  जेसीबी आणि ट्रॅक्टरने वाळू उपसा करत आहेत. त्या संदर्भात प्रताप दातार याने  वाळू उपसा बंद करून तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर कार्यवाही करावी. अन्यथा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाचा ईशारा दिला होता. त्या संदर्भात विविध दैनिकांत बातम्या देखील प्रकाशित झाल्या होत्या. त्यामुळे चिडून वाळू माफियांनी त्यांच्या हस्तकाकरवी दि. ९ ऑगस्ट रोजी प्रताप दातार हा मस्साजोग येथून त्याच्या एका मित्र हनुमंत दातार याच्या सोबत परत बेलगावकडे जात असताना रात्री ८:३० च्या दरम्यान केळगाव जवळ तीन अनोळखी इसमांनी त्यांची मोटार सायकल अडवून त्यांना थांबविले. त्यातील एकाने त्याच्या गच्चीला धरून दोघांना मोटारसायकल वरून खाली उतरविले. तर दुसऱ्याने त्याच्या जवळील पिस्तुल कानाला लावून "तू आमच्या विरोधात वर्तमानपत्रात बातम्या का देतोस ?" असे म्हणून अर्वाच्य शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्या नंतर प्रदीप दातार याने त्यांच्या पासून सुटका करून घेतली आणि ही घटना त्याने मोबाईल करून त्याचा बीड येथील मित्र नीळकंठ वडमारे यास सांगितली. नंतर प्रदीप दातार याने दि. १० रोजी सायंकाळी सुमारे ८:०० वा. केज पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन या प्रकरणी तक्रार दिली. त्या नुसार लक्ष्मण भोसले वकील, रा. वरपगाव, तुळशीराम घुले रा. बेलगाव, राजेभाउ इतापे रा. आरणगाव व तीन अनोळखी इसम यांच्या विरोधात गु.र.न. ३०७ /२०२० भा.दं.वि. ३४१, ५०४, ५०६, ३४ सह शस्त्रातस्त्र प्रतिबंधक कायद्याचे कलम ३/२५ प्रमाणे गुहा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस आणि पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे तपास करीत आहेत. अद्याप पर्यंत यातील आरोपीना अटक करण्यात आली नसल्याची माहीती विश्वासनिय सूत्रांकडून मिळाली आहे.
close