गडचिरोली :-
कोरोणा लोकडॉऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या आंतरजिल्हा वाहतूक बंद केली गेली आहे. कामानिमित्त नागरिकांना दुसऱ्या जिल्ह्यात ये-जा करावी लागत आहे. यात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याने आंतरजिल्हा वाहतूक पूर्ववत सुरू करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी बुधवारी येथील बसस्थानकावर डफली बजाव आंदोलन केले.
आंदोलनाचे नेतृत्व आघाडीचे जिल्हा प्रभारी बाळू टेंभुर्णे, पक्षाचे महासचिव योगेंद्र बांगरे, जी.के. बारसिंगे, गुलाब मुगल, महिला आघाडीच्या माला भाजगवडी, धर्मेंद्र गोवर्धन, राजेंद्र बांबोळे यांनी केली. 25 मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात अनेक उपाययोजना करण्यात आल्या त्याप्रसंगी देशभरात सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली त्यामुळे नागरिकांनी खासगी गाड्या करून आपाआपल्या जिल्ह्यात जाणे सुरु केले. परिणामी यात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. अर्थव्यवस्था संकटात आली आहे. आर्थिक दुष्परिणाम समोर येत आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बस सेवा ताबडतोब सुरू करावी अशी मागणी बाळू टेंभुर्णे यांनी केली.
८० टक्के नागरिकांनी कोरोनाविरूद्ध लढण्याची प्रतिकारक्षमता दाखविली आहे, तर १५ टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देत कोरोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत, केवळ ५ टक्के लोक प्रतिसाद देत नाही नाहीत. शासनाने या २० टक्के लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सर्व प्रयत्न करावे व ५ टक्के लोकांसाठी ९५ टक्के लोकांना वेठीस धरणे थांबवावे, असे बाळू टेंभुर्णे म्हणाले.
त्यानंतर तहसीलदार महेंद्र गणवीर हे आंदोलनस्थळी आले असता त्यांना निवेदन देण्यात आले.या आंदोलनात मिलींद बारसागडे, प्रवीण खोब्रागडे, किशोर फुलझेले, संदीप सहारे, अनिल राऊत, अमिता मडावी, सुनंदा देवतळे, लता शेंद्रे, एन. आर. रामटेके, जगन बंसोड, अनिल निकुरे, भोजराज रामटेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.