इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
इंदापूर दि.13/08/2020 रोजी बाबा चौक येथे रोग प्रतिकार क्षमता वाढविणारा मालेगाव पॅटर्न आयुर्वेदिक काढा मोफत वितरण दिनांक 9 ऑगस्ट पासून नऊ दिवस मोफत वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे .सध्या इंदापूर मध्ये वाढत्या कोरोनाविषाणू ही चिंतेची बाब असून लोकांच्या मध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून माळेगाव पॅटर्न पद्धतीने आयुर्वेदिक काढा तयार करून सध्या इंदापूर येथे बाबा चौकामध्ये मोफत वाटप गेले पाच दिवसापासून चालू आहे .
आपल्या शहरातील आपले समाज बांधव यांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी व जागतिक संकटामध्ये संघर्ष योद्धा म्हणून प्रत्येकाने जीवन जगावे या हेतूने आपल्या समाजाची सेवा करणारे जय हिंद व त्रिदल माजी सैनिक संघटना ,जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज, रचना परिवार ,प्रहार दिव्यांग संघटना. इंदापूर सायकल क्लब व युवा क्रांती प्रतिष्ठान या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व मानवी समाजाचे उन्नती च्या दिशेने प्रगती ती करावी या संकल्पनेतून चालणाऱ्या सामाजिक संस्था यांनी हा नऊ दिवसाचा उपक्रम मोफत स्वरूपात राबवला आहे. जीवन जगत असताना समाजाला आपलं देणं आहे या नात्याने या संघटनेतील सर्व समाज बांधव आपापल्या परीने या उपक्रमात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे .त्यांचा उपक्रम इंदापूर तालुक्यात दैदिप्यमान असा असून प्रेरणादायी आहे.
त्यांनी सदर गाड्यांमध्ये पाणी, दालचिनी, काळीमिरी ,लवंग इलायची ,तुळशीची पाने ,गुळ अद्रक ,हळद इत्यादीच्या मिश्रणातून हा आयुर्वेदिक काढा आपल्या चहासारखा एक कप प्रति व्यक्ती या स्वरूपात देत आहेत. या चहा चे वाटप प्रहार दिव्यांग संघटना चे दिव्यांग असणारे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडोळे हे या काड्या चे वाटप करीत होते त्यावेळेस त्यांनी माहिती दिली.
या उपक्रमास युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत दादा सिताफ तुकाराम बानकर दसरथ भोंग धरमचंद लोढा व व अनेक मान्यवर यांनी विशेष सहकार्य करून युवा क्रांती आयुर्वेदिक काढा मोफत वाटप केले
सदर ठिकाणी आयुर्वेदिक काढा पीत असताना सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार मित्रपरिवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. या उपक्रमाचा लाभ इंदापूर मधील सर्व स्तरातील लोक घेत असल्याचे निदर्शनास येत आहे