shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये शिरले पर्लकोटा नदीचे पाणी... १०० गावाचा संपर्क तुटला...!!

गडचिरोली ता. १६ :- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने पुराचे पाणी गावात शिरले आहे. नदीच्या पुराचे पाणी गावात शिरल्याने अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली आली आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने जवळपास १०० गावाचा संपर्क तुटला आहे. 

त्यामुळे भामरागड मधील सुमारे पन्नास कुटुंबीयांनी स्वतः सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे.
चार पाच दिवसापासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी पर्लकोटा नदीचे विस्तीर्ण पात्र शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पाणी पुलावर चढण्यात सुरुवात झाली. त्यामुळे हळूहळू वाहतूक पूर्णपणे बंद झाली. पुराचे पाणी भामरागडच्या बाजारपेठ शिरू लागले. नागरिकांचे व दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे. पुलावरील पाण्यातून पैलतीर गाठण्याचा कोणी प्रयत्न कोणी करू नये म्हणून प्रशासनाने दोन्ही तीरावर कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे.

  विजपुरवटा व मोबाईल संपर्क सुरू राहावा यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.तहसीलदार प्रकाश उप्पुलवार, अनमोल कांबळे , नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज यादव परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. तालुक्यात १२६.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे . पुन्हा मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
close