लोहा प्रतिनिधी ➤ लोहा तालुक्याचे भूमिपुत्र सुनील पाटील शिंदे हे नुकत्याच घेतलेल्या भारतीय प्रशासन सेवा यूपीएससीच्या परीक्षेत अव्वल गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल लोहा, कंधार विधानसभेचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या लोहा येथील जनसंपर्क कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सुनील पाटील शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
लोहा तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात उंचावल्या बद्दल सुनील पाटील शिंदे यांचा सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या ,या वेळी कार्यक्रमास आमदार शामसुंदर शिंदे यांचे समर्थक कार्यकर्ते श्याम आण्णा पवार ,सतीश कराळे ,पप्पू चव्हाण, बालाजी वाघमारे ,सचिन कल्याणकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी सुनील पाटील शिंदे यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.