shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज कोवीड सेंटरचा स्तुत्य उपक्रम..! कोरोना रुग्णांसाठी योगा अभ्यासाचे धडे..!!

केज तालुका प्रतिनिधी । प्रकाश मुंडे:-  
उपजिल्हा रुग्णालय केज अंतर्गत कोवीड सेंटरमध्ये कोरोना रूग्णांसाठी योगाअभ्यास सुरू करण्यात आले आहेत.

वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरूणा केंद्रे(दहीफळे),डॉ.
अस्वले यांच्या नियोजनातून कोरोना संक्रमित रूग्णासाठी  हे योगअभ्यास ठेवण्यात आले आहेत.
रूग्णांचे स्वास्थ्य व मनोबल वाढवणे, सकस आहार व औषधोपचार बरोबरच रूग्णांना केज कोवीड सेंटर येथे योगासने शिकवले जात आहेत. यामुळे रुग्णांचे स्वास्थ्य व मानसिकता टिकून त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल असे असे  डॉ केंद्रे मँडम यांनी सांगितले.

केज येथील कोवीड सेंटरमध्ये रूग्णांची चांगल्याप्रकारे सोयसुविधा, औषधोपचार व डाँक्टर व येथील सर्व स्टाफ रूग्णांची काळजी घेत असल्याचे अनेक बरे झालेल्या रुग्णांनी बोलून दाखविले आहे.
केज कोवीड सेंटर येथे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरूणा केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. अस्वले,डॉ. स्नेहा राऊत, डॉ. हार्षद अलाट, योग शिक्षक मुथळे, 👍 राजसाहेब  ढाकणे, सोनवणे, शिंदे, जोगदंड, घाटूळ हे सर्व कोरोना रूग्णास आरोग्य सेवा देण्यासाठी परिश्रम घेत असून
आता कोरोना रूग्णासाठी सुरु केलेल्या योगअभ्यास वर्गाचे सर्व क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय केज व कोवीड सेंटर येथील सर्व स्टाफचे अभिनंदन केले आहे. विशेष करून राज ढाकणे यांचे कोवीड रूग्णालयातील काम कौतुकास्पद आहे.
close